Latur Crime : उदगीरमध्ये बँक कर्मचार्‍याची फसवणूक, दीड लाखांची ऑनलाइन चोरी

बँक कर्मचाऱ्याची ऑनलाईन फसवणूक
online fraud news
online fraud newsesakal
Updated on

उदगीर (जि.लातूर) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हंडरगुळी (ता.उदगीर) (Udgir) येथील कार्यरत लिपीक गजानन पंदरगे यांची अनोळखी व्यक्तीने एक लाख शेचाळीस हजार दोनशे रुपयाची ऑनलाईन फसवणुक (Online Fraud) केल्याची फिर्याद दिल्यावरुन शनिवारी (ता.२२) वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसाकडुन मिळालेली माहिती, अशी फिर्यादी गजानन संग्राम पंदरगे (वय ३८) यांच्या मोबाईल नंबरवरुन कोन बनेगा करोडपतीचे राणा प्रताप सिंह नावाच्या अनोळखी व्यक्तीने व्हाॅसअप व्हाइस काॅल करुन तुम्हाला पंचवीस लाख रुपयांची लाॅटरी लागली आहे, असे म्हणुन प्रोसेसिंग फिस म्हणुन १ लाख ४६२०० रुपये भरुन घेऊन ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातुन फसवणुक केली. (One And Half Lakh Online Cheating With Bank Employee In Udgir Of Latur)

online fraud news
Hingoli : डोक्यात दगड घालून तरुणाचा निर्घृण खून,औंढ्यातील धक्कादायक घटना

फिर्यादीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजीले यांच्या आदेशावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जळकोट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.बी. कदम करित आहेत.(Latur News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.