जिंतूर - शहरात मंगळवारी (ता. १७) श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत 'डीजे' च्या धडपडणाऱ्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला असून तिघे अस्वस्थ झाले. त्यांना परभणी येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.सदरील दुर्घटना रात्री साडेआठ ते नवूच्या दरम्यान घडली. .शहरात सायंकाळी चार वाजेपासून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणूक पोलिस ठाण्यात समोरच्या मार्गावरून जात असताना एका मंडळाच्या डीजेच्या धडकी भरणाऱ्या आवाजातील गाण्यावर मिरवणुकीतील कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असताना चार जणांना अस्वस्थ झाले.एकास खूप घबराट होऊ लागल्याने त्याला शहरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले. अन्य तिघांना प्रथमोपचारानंतर परभणी येथे शासकीय रुग्णालयात हलवले..विशेष म्हणजे मिरवणुकीत डीजे लावण्याचे निर्बंध असतानाही यावेळी तीनचार मंडळांनी डीजे लावले होते. आणि मिरवणूकीत पोलिस बंदोबस्त होता. परंतु याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. वास्तविक मिरवणूक काढण्यापूर्वीच संबंधित मंडळ, डीजे चालक यांच्यावर कारवाई केली असती तर सदरची घटना घडली नसती. याबाबत शहरात चर्चा केली जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.