Beed News : बीड जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत

शासनाने यंदा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
One lakh students of Beed district are waiting for uniform school education department
One lakh students of Beed district are waiting for uniform school education departmentsakal
Updated on

बीड : शासनाने यंदा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होऊन आता दीड महिना उलटून गेला; परंतु गणवेश अद्याप मिळालेला नाही. आता १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) जवळ आला असून त्या आधी तरी गणवेश मिळावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील दीड लाख विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित आहेत. शिक्षण विभागाने गणवेशाची मागणी नोंदवूनही शासन स्तरावरून नवीन गणवेश मिळालेले नाही. गणवेश मिळाला नसला, तरी बूट, मौजे यांचे पैसे शाळांना प्राप्त झाले असून मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीकडून याची खरेदी करून विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात येत आहे.

१५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील २४७८ शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांना गोड खाऊ देत विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढत स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मात्र, जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ७४८ विद्यार्थ्यांना अजूनही नवीन गणवेश मिळालेले नाहीत.

One lakh students of Beed district are waiting for uniform school education department
Beed News : रस्त्यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; धानोरा रोडच्या दुरुस्तीची मागणी, घोषणांनी दणाणला परिसर

मागील वर्षी झालेल्या गोंधळामुळे गणवेश वाटपात बदल करण्याचा निर्णय घेत एकाच रंगाचा गणवेश देण्याचा निर्णय झाला. एक नियमित गणवेश संच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांतर्फे शिलाई करून पुरविण्यात येणार आहे.

तर स्काउट-गाइडचा एक गणवेश संबंधित शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून शिलाई करून पुरविण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक निधी प्राप्त न झाल्यामुळे मोफत गणवेश वाटपात विलंब होत आहे. आता १५ ऑगस्टजवळ आला असून स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांनी जुन्या गणवेशात कसा साजरा करायचा असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे.

विद्यार्थ्यांना बूट व मोजे घेण्यासाठी जिल्ह्यातील एकूण २४७८ शाळांना प्रती विद्यार्थी १७० रुपयांप्रमाणे एकूण २ कोटी ६३ लाख सात हजार १६० रुपये वितरित करण्यात आले आहेत. शालेय समिती व मुख्याध्यापक यांच्याकडून बूट व मोजे खरेदी करून ते विद्यार्थ्यांना दिले जात आहेत.

One lakh students of Beed district are waiting for uniform school education department
Beed Crime : दीड महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटून मारहाण! 11 जणांवर जीवघेणा हल्ला; दरोड्याच्या घटनेने हादरला बीड जिल्हा

गणवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या (तालुकानिहाय)

  • अंबाजोगाई - १७५ शाळा- १२०५६ विद्यार्थी

  • आष्टी - २७६ शाळा -१७२५५ विद्यार्थी

  • बीड (बीआरसी) -४०२ शाळा -२२३४१ विद्यार्थी

  • धारूर - ३० शाळा -८७८६ विद्यार्थी

  • गेवराई -३२८ शाळा -२५५९५ विद्यार्थी

  • केज - २४६ शाळा -१४०८४ विद्यार्थी

  • माजलगाव - २२६ शाळा- १६०८२ विद्यार्थी

  • परळी -१८९ शाळा -१३०४३ विद्यार्थी

  • पाटोदा -१८२ शाळा -८४२७ विद्यार्थी

  • शिरूर -१८९ शाळा -८०२७ विद्यार्थी

  • वडवणी - १०१ शाळा- ६८६६ विद्यार्थी

गणवेश तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून वडवणी तालुक्यात काही शाळांमध्ये गणवेश पोच झाले आहेत. तसेच इतर शाळांमध्ये सुद्धा १० ऑगस्टपर्यंत गणवेश पोच होतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

— ऋषिकेश शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.