शेतकऱ्यांना केवायसी ठरतेय डोकेदुखी

संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे मनस्ताप
KYC
KYCSakal
Updated on

फुलंब्री - पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन केवायसी अनिवार्य केले आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रासह तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातही शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. मात्र, संकेतस्थळावर केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील शेतकरी सीएससी केंद्रावर चकरा मारून हैराण होत असताना तालुकास्तरावर तहसील कार्यालयात गेल्यास कृषी विभागाकडे पाठवले जाते. तहसीलमधील सेतू सुविधा केंद्रात केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मात्र, संबंधित संकेत स्थळे वारंवार हॅंग होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत केवायसी न झाल्यास शेतकऱ्यांना हप्ता कसा मिळणार नाही. त्यामुळे "ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण झालेले नाही. त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. यामुळे बळिराजा अडचणीत सापडला आहे.

वरिष्ठांनी दखल घ्यावी

केवायसी पूर्ण करण्यासाठी असलेली शासनाची संकेतस्थळ वारंवार हँग होत आहे. ३१ मार्चनंतर आता मुदत वाढवून ३१ मे करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुदत संपत असल्याने शेतकऱ्यांना योजनेचा लाभ न मिळण्याची भीती सतावत आहे. याबाबत महसूल व कृषी, ग्राम विकास विभागाने पुढाकार घेत शासनस्तरावर तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. विशेष म्हणजे संकेतस्थळ वारंवार हँग होण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी व सेतू चालक केंद्र चालकाचा बाचाबाची होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

महसूल व कृषी विभागाचा वाद मिटवा

फुलंब्री तालुक्यातील जमिनीची खातेफोड झालेले अनेक शेतकरी अजूनही पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून वंचित आहे. या शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी विभाग व महसूल विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने नवीन नोंदणी होत नाही. महसूल विभागाचा पंतप्रधान किसान सन्मान योजनेवर बहिष्कार असल्याने या योजनेची अंमलबजावणी करणार कोण. असा प्रश्न सर्व समोर उपस्थित झाला आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी शासनाने महसूल व कृषी विभागाचा वाद मिटवावा अशी मागणी शेतकाऱ्यांतून होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.