परभणी : लॉकडाउन आणि शाळाबंदच्या काळात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये आणि अभ्यासाची गोडी कायम राहावी यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन शिकवणी सुरू केली आहे. यामध्ये गणित, इंग्रजी विषयासह स्पर्धा परिक्षांचा अभ्यास घेतला जात आहे. त्यासोबतच सराव परीक्षादेखील घेण्यात येत असून शनिवारी (ता. ११) ऑनलाइन सराव चाचण्या सुरू करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमशील शिक्षकांनी तयार केलेला अभ्यासक्रम शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचविला जात आहे. त्यामुळे सहज खेळत-बागडत विद्यार्थी घरात, शेतात, बाल्कनीत बसून अभ्यास करू लागले आहेत. लहान बालकांना आधीच मोबाइलचे आकर्षण असल्याने विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासात रमत आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एनएएस, एएसईआर परीक्षेच्या धर्तीवर ऑनलाइन टेस्ट (चाचणी) हा उपक्रम शनिवार (ता.११) पासून जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. यात दररोज पालकांच्या मोबाइलवर ही गणितं ऑनलाइन टेस्ट पाठविली जात आहे. यासाठी पालकांची शिक्षकांकडून या बाबत जनजागृती केली जाणार आहे.
हेही वाचा - मदत कार्यात बचत गटही सरसावले !
विषयनिर्मिती गट तयार
ऑनलाइन टेस्ट (चाचणी) साठी गणितातील अभ्यासू शिक्षकांचा गणित विषय निर्मिती गट तयार करण्यात आला आहे. या गटात गणेश भैरट, दशरथ मुंडे, सुशील वाघमोडे, मंगेश मलवाड, विनायक पौळ, डी. के. पवार, संतोष डांगे, संतोष मगर, कौतिक भवर, डी. एन. ननुरे, निलेश स्वामी, अनिल स्वामी, संदीप काळे, शिवप्रकाश पुरी, लक्ष्मण गारकर, तूरकर यांचा समावेश आहे.
हेही वाचा - आमदार रोहित पवार यांनी पाठविले परभणीत सॅनिटायझर
वुई लर्न इंग्लिशवर भर
मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची संकल्पना असलेला वुई लर्न इंग्लिश हा उपक्रम मागील काही महिन्यापासून जिल्ह्यात राबविला जात आहे. त्याचे आकाशवाणी केंद्रावरूनदेखील प्रसारण सुरू होते. परंतु, सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे या उपक्रमात खंड पडू नये म्हणून यूट्युबच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३० दिवसांचा इंग्लिश ई-टीच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
मोबाइल, इंटरनेटचा वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व्हावा म्हणून सध्याच्या बंद दरम्यान, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आता गणित, इंग्रजी विषयासोबतच अन्य विषयदेखील सुरू केले जाणार आहेत.
-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणधिकारी, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.