Heart Surgery: 'लातूरला तेरा मुलांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’

विवेकानंद रुग्णालय; शासनाच्या योजनांसह देणगीदारांची मदत
Vivekananda Hospita Open Heart Surgery 13 children
Vivekananda Hospita Open Heart Surgery 13 childrensakal
Updated on

लातूर- ओपन हार्ट सर्जरी म्हटले की रुग्णांना पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी जावे लागत होते. पण आता ही शस्त्रक्रिया लातुरात होऊ लागली आहे.

येथील विवेकानंद रुग्णालयात डॉ. नितीन येळीकर आणि डॉ. सारंग गायकवाड यांच्या टीमने एका महिन्यातच ३४ बालकांवर (४ महिने ते बारा वर्षांपर्यत) हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. यात १३ बालकांवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे.

Vivekananda Hospita Open Heart Surgery 13 children
Pune News : गायक, कलाकारांसाठी व्हाइस केअर’ उपयुक्त - पंडित सुरेश तळवलकर

या रुग्णालयात मागील वर्षभरात बाल हृदयविकाराच्या शंभरहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात फेब्रुवारीतच ३४ बालहृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

यात २१ बिनटाक्याच्या शस्त्रक्रियांसह १३ ओपन हार्ट सर्जरींचाही समावेश आहे. या सर्व शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेसह देणगीदारांची मदतीतून करण्यात आल्या आहेत.

यशस्वी शस्त्रक्रिया केल्याबद्दल विवेकानंद रुग्णालयाचे प्रमुख अनिल अंधोरीकर, डॉ. अशोक कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. देवधर, डॉ. अरुणा देवधर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी, डॉ. गौरी कुलकर्णी यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.

हृदयविकार जागृती सप्ताह

७ ते १४ फेब्रुवारी हा आठवडा जागतिक जन्मजात हृदयविकार जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्त आयोजित तपासणी शिबिरात एकूण ७२ बालरुग्णांची तपासणी करण्यात आली होती. या रुग्णांपैकी ३४ रुग्णांवर या महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

ता.४ व ५ फेब्रुवारी रोजी १५ शस्त्रक्रिया झाल्या तर १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान १९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या सरकारी योजना तसेच देणगीदारांच्या आर्थिक मदतीतून झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()