उमरगा : तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीजचा गळीत हंगाम २०२१-२२ चा तिसरा दिडशे रुपये ऊस बिलाचा हप्ता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली आहे. उमरगा तालुक्यात काही दिवसापूर्वी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उमरगा - लोहारा तालुक्यातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर केले होते, तोच शब्द पाळत श्री. पवार यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात दीडशे रुपये तिसरा हप्ता जमा करून परिसरातील कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक पंचवीसशे रुपये भाव देऊन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची दिवाळी साजरी केली आहे.
भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना (क्युनर्जी ) कारखान्यांने चौथ्या गाळप हंगामात चार लक्ष ५३ हजार मे ट्रीक टन गाळप केले आहे. २०२१-२२ करिता गाळप झालेल्या उसाचा पहिला हप्ता प्रति टन रूपये दोन हजार २५० दुसरा हप्ता रूपये शंभर तर आता शेवटचा तीसरा हप्ता रूपये ऊस बिल ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांच्या "भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकच्या सर्व शाखेत शेतकऱ्यांचा बँक खात्यावर जमा झालेला आहे. उसाला सर्वाधिक भाव दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळत परिसरातील कारखान्यांपेक्षा सर्वाधिक पंचवीसशे रुपये भाव दिलेला आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपली गाळप क्षमता वाढवली आहे. कारखान्याचा वजनकाटा तंतोतंत असल्याने व प्रथमच सर्वाधिक भाव दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांनी गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला द्यावा.
- प्रा. सुरेश बिराजदार, अध्यक्ष भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना
बॉयलर अग्निपदीपन
कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकरराव हराळकर व संचालक गोविंदराव साळुंखे यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलर अग्निपदीपन पूजन शनिवारी (ता. १५) कारखान्याचे जनरल मॅनेजर संजीव गुरव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.