उस्मानाबादेत पन्नास टक्केच लसीकरण; नागरिकांची लसीकरणाकडे पाठ

दुसऱ्या लाटेत अनेकांना रूग्णालयाची पायरी चढावी लागली. परंतु, ज्यांनी लसीकरण करून घेतले त्यांना दुसऱ्या लाटेची फारशी तीव्रता जाणवली नाही
covid 19
covid 19covid 19
Updated on

उस्मानाबाद: जिल्ह्यातील साधारण सहा लाख लोकसंख्या ४५ वर्षांपुढील आहे. यातील अडीच ते तीन लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर निम्मे लोक अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. यातून जिल्ह्यात आजवर केवळ ५० टक्केच लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे नागरिक लसीकरणाबाबात उत्सुकता दाखवत नाहीत. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी लसीकरण गरजेचे असल्याचे आरोग्य विभागातून सांगितले जात आहे. कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने कमी झाला आहे. परंतु, जिल्ह्यात अद्यापही दररोज सरासरी १०० रुग्ण आढळून येत आहेत.

दुसऱ्या लाटेत अनेकांना रूग्णालयाची पायरी चढावी लागली. परंतु, ज्यांनी लसीकरण करून घेतले त्यांना दुसऱ्या लाटेची फारशी तीव्रता जाणवली नाही. १ एप्रिल २०२१ पासून जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समाविष्ट आहे. तसेच उपकेंद्र स्तरावरही लस देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी उपकेंद्राची इमारत, इंटरनेट सेवा, लोकसंख्या ५००० असेल अशा ठिकाणी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

covid 19
धानुरी ठरतंय कोरोनाचे 'हॉटस्पॉट'; दोन दिवसांत तब्बल ५३ रुग्ण

सध्या ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एका गावाची निवड करून ४४ ठिकाणी ग्राम स्तरावर लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. शासनाने ४५ वर्षे वयोगटातील सर्वांसाठी लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. असे असतानाही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. अनेक लसीकरण केंद्रावर सध्या लस शिल्लक राहत आहेत. वारंवार आवाहन करूनही लसीकरण करून घेण्यास नागरिक उत्सुकता दाखवीत नाहीत.

गावातील जाणकार नागरिकांनी, पुढाऱ्यांनी लसीकरणासाठी पुढाकार घेऊन ४५ वर्षांपुढील नागरिकांस या मोहिमेत समाविष्ट करावे. वाहनाची सोय करून पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.