उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बापूराव पाटील, उपाध्यक्षपदी मोटे

शिवसेनेला बाजुला सारत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली असुन महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसुन येत आहे.
Bapurao Patil And Madhukar Mote
Bapurao Patil And Madhukar Moteesakal
Updated on

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Osmanabad District Cooperative Bank Election) अध्यक्षपदी काँग्रेसच्या बापुराव पाटील यांची वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे हे निवडुन आले आहेत. शिवसेनेला बाजुला सारत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली असुन महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचे दिसुन येत आहे. सोमवारी (ता.सात) ही निवड करण्यात आली असुन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) तीनही पक्षाने अध्यक्षपदावर दावा सांगितला होता. मात्र तहामध्ये माघार घेण्यास कुणीही तयार नसल्याने अखेर शिवसेनेला (Shiv Sena) बाजुला केल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया घ्यावी लागली आहे. काँग्रेसने बाजी मारत अध्यक्षपद पदरात पाडुन घेतले आहे. राष्ट्रवादीने (NCP) उपाध्यक्षपद मिळवत सत्तेत वाटा उचलला आहे. (Osmanabad District Bank Election Bapurao Patil Appointed As Chairman, Madhukar Mote Vice President)

Bapurao Patil And Madhukar Mote
युक्रेन-रशिया युद्धामळे इजिप्त, तुर्कस्तान, लेबनाॅनमध्ये अन्नधान्याची टंचाई

महाविकास आघाडी करुन तिन्ही पक्षाला प्रत्येक पाच जागा मिळालेल्या असल्याने अध्यक्षपदावर सारखाच दावा या तीनही पक्षाकडुन करण्यात आला होता. राज्यपातळीवरुन ही तोडगा निघाला नाही. म्हणुन सेनेकडुन संजय देशमुख व उपाध्यक्षासाठी बळवंत तांबारे असे उमेदवारी अर्ज भरले होते. त्या विरोधात बापुराव पाटील व उपाध्यक्षासाठी मधुकर मोटे होते. अकराविरुध्द चार अशा फरकाने हा विजय झाला आहे. शेवटी अध्यक्षपदाची माळ काँग्रेस पक्षाच्या बापुराव पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक महाविकास आघाडीच्या तिनही पक्षानी एकत्रित निवडणुक लढविली होती. त्यामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश देखील मिळाले आहे. विरोधी भाजप गटाला एकही जागा मिळु न देण्यात आघाडीला मोठ यश मिळाले आहे. आघाडीत बिघाडी करण्याचा मोठा प्रयत्न देखील भाजप नेत्यांनी केल्याचे दिसुन आले होते. पण हा प्रयत्न देखील महाविकास आघाडीच्या नेत्यानी हाणुन पाडत एकतर्फी विजयश्री खेचून आणली होती. आघाडीमध्ये अध्यक्षपद मिळविण्यासाठी तिन्ही पक्षाने गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत शक्ती दाखविण्यास सूरुवात केली आहे. सध्याच्या स्थितीला बँकेची स्थिती जरी अडचणीची असली तरी भविष्यात मात्र बँकेची स्थिती काही अंशी सुधारण्याची शक्यता आहे. अशावेळी बँकेचे अध्यक्षपद आपल्याकडे राहिले पाहिजे अशी भुमिका तिनही पक्षाकडुन व्यक्त होत आहे.

Bapurao Patil And Madhukar Mote
'बामू'मध्ये कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

तेरणा व तुळजाभवानी कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पार पडली असुन त्यातील तुळजाभवानी कारखाना तर सूरु देखील झाला आहे. तेरणाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक दोष काढल्याने ते प्रकरण न्यायालयात आहे. दोन ते अडीच महिन्यात त्याचाही दावा निकाली निघण्याची शक्यता आहे. साहजिकच हे दोन मोठे कारखाने भाड्याने दिल्याने बँकेला मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय पुढील काळात या शिखर बँकेने घेतलेली थकहमीची रक्कम देखील या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेही काही प्रमाणात बँकेच्या स्थितीमध्ये फरक पडणार आहे. त्यामुळे तिनही पक्ष या पदासाठी आग्रही होते. जिल्ह्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेवर पहिल्यापासुन वर्चस्व राहिले आहे. शिवसेनेचा एखाद दुसरा संचालक निवडुन येण्याची शक्ती होती. यंदा मात्र पाच जण निवडुन आल्याने पक्षाला मोठ बळ मिळाले आहे. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या प्रक्रियेत शिवसेनेला डावलल्याने पुन्हा सेनेला विरोधात बसण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()