उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांना बायोगॅसचे बळ

स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचा उपक्रम, ४०० शेतकऱ्यांनी केली मागणी
Osmanabad farmer bio gas
Osmanabad farmer bio gas
Updated on

उस्मानाबाद : स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने अल्पदराने बायोगॅसचा प्रकल्प दिला जात आहे. ३६ हजारावरून केवळ आठ हजार रुपये किंमत ठेवल्याने जिल्ह्यातून सुमारे ४०० शेतकऱ्यांची मागणी आली आहे. यातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

गॅस सिलेंडरच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी ग्रामीण भागात बायोगॅस संकल्पना राबविण्याची संकल्पना पुढे येत आहे. संयशिक्षण प्रयोग ही संस्था यासाठी काम करीत आहे. सध्या सहा-सात नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येक सिलिंडरला एक हजार रुपये मोजावे लागतात.

आर्थिक गणित

सात ते आठ जणांच्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडर म्हणजेच १४ किलो गॅस लागतो. सहा नागरिकांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या बायोगॅस मॉडेलची किंमत ३६ हजार रुपये आहे. मात्र दिपावळीच्या निमित्ताने संस्थेने आठ हजार २०० रुपयांना देऊ केला आहे. केवळ १० महिन्यात प्रकल्पाचे पैसे वसूल होतात.

प्रकल्पाची १० वर्षांची गॅरंटी असून २५ वर्षे या प्रकल्पाला काहीही होत नाही. त्यामुळेच शासनाकडून यासाठी प्रोत्साहन दिले जात असून त्याची किंमतही कमी झाल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

चार ते सहा जनावरे

बायोगॅस प्रकल्पात एक इनलेट तयार केलेले असते. त्यानंतर गोलाकार प्लॅस्टिक बॅगमध्ये स्लरी जाते. बॅगवरील बाजूने पाईपद्वारे गॅस आवश्‍यक ठिकाणी पोहच केला जातो. तर स्लरी शेतीच्या पिकांना पोषक ठरते. सहा नागरिकांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या प्रकल्पास चार ते सहा जनावरे असावी लागतात. त्यातून ४० ते ६० किलो शेण १०० लिटर पाण्यात मिसळावे लागते. त्यातून दिवसाला सरासरी अर्धा किलो गॅस तर १४० किलो स्लरी मिळते.

या प्रकल्पाची किंमत ३६ हजार रुपये असताना सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर तीन जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षात ५०० बायोगॅस बसविले आहेत. सध्या संस्थेने दिपावळीच्या निमित्ताने याची किंमत कमी केली असून आठ हजार २०० रुपयांना दिला जात आहे. त्यामुळे गेल्या सात-आठ दिवसांमध्ये ४०० शेतकऱ्यांची मागणी एकमेव उस्मानाबाद जिल्ह्यातून आली आहे.

- उपमन्यू पाटील, संचालक, स्वंयशिक्षण प्रयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.