ग्रामीण भागाच्या विकासासाठी बांधिल राहून विनातक्रार सेवा करण्यात येत आहे. ग्रामसेवक संवर्गाच्या अनेक मागण्या गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असून यासाठी निवेदन देवून आंदोलन करूनही प्रश्न सुटले नाहीत.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यात Umarga ग्रामसेवक संवर्गाच्या विविध मागण्यांची गेल्या एक वर्षांपासून शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने १४ जुनपासून असहकार आंदोलन करण्यात आले, तरीही मागण्याची त्वरित पूर्तता न झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या उमरगा येथील शाखेने मंगळवारपासुन (ता. २२) काम बंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान ऐन कोरोना काळात थांबलेले विकास कामे सुरु असताना आता ग्रामसेवक संघटनेच्या आंदोलनामुळे कामे ठप्प होतील. गटविकास अधिकारी Block Development Officer आणि पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १७ मार्च २०२० पासून ग्रामसेवक Gram Sevak जीव धोक्यात घालून कोरोना संसर्ग कामात सक्रिय आहेत. बाहेर गावाहून आलेल्यांना विलगीकरण करणे, गावात औषधीची फवारणी करणे, प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे यासह दैनंदिन कामे व शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या असतानाही ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बांधिल राहून विनातक्रार सेवा करण्यात येत आहे. ग्रामसेवक संवर्गाच्या अनेक मागण्या गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असून यासाठी निवेदन देवून आंदोलन करूनही प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे १४ जूनपासून असहकार आंदोलन करण्यात आले.osmanabad news gram sevak sanghatna work shut down agitation in umarga
तरीही राज्य सरकार बेदखल करत असल्याने मंगळवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आले. कोविड संदर्भातील कामे वगळता इतर कोणतेही कामे ग्रामसेवक करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण जकेकुरे, सचिव एस. एस. कांबळे, उपाध्यक्ष बालाजी निकम, सहसचिव एल. जी. कांबळे यांच्यासह ग्रामसेवक युनियनच्या सदस्यांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.