कारखाना राजकारणाचे केंद्र असला तरी यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखाना सुरू झाल्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबू शकत नाही.
उस्मानाबाद : जिल्ह्याच्या Osmanabad राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा ढोकी (ता.उस्मानाबाद) येथील तेरणा सहकारी साखर कारखाना Terna Cooperative Sugar Mill सुरु व्हावा. यासाठी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनीही याबाबत `स्थानिक नेत्यांनी जबाबदारी घ्यावी` अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी कारखाना सुरू होईल. यासाठी देव पाण्यात ठेवून बसले आहेत. मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना First Sugar Mill In Marathwada म्हणून तेरणा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. गेली अनेक वर्षे या कारखान्यावर माजी गृहमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील Padmasingh Patil यांची सत्ता होती. त्यानंतर हा साखर कारखाना विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर MP Omprakash Rajenimbalkar यांच्या नेतृत्वाकडे गेला आहे. कारखाना राजकारणाचे केंद्र असला तरी यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखाना सुरू झाल्याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबू शकत नाही. याची पूर्ती जाणीव शेतकऱ्यांना असल्याने कारखाना सुरू होण्यासाठी शेतकरी देव पाण्यात ठेऊन बसले आहेत. त्यातच उपमुख्यंत्री अजित पवार यांनी याबाबत `स्थानिक नेत्यांनी पुढाकर घ्यावा` अशी सूचना केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.osmanabad news is terna sugar mill starts its operation?
तेरणा का सुरु व्हावा?
जिल्ह्यात सध्या अनेक साखर कारखाने आहेत. काहीची क्षमता एक हजार ते अडीच हजार टन प्रतिदिन अशी क्षमता आहे. तर एकट्या तेरणा साखर कारखान्याची क्षमता १० हजार मेट्रिक टन प्रतिदिन आहे. त्यामुळे तेरणा साखर कारखाना सुरू झाला तर परिसरात चार ते पाच कारखाने सुरू झाल्यासारखे आहे. जिल्ह्यात मागीत तीन-चार वर्षे दुष्काळ होता. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र फारसे वाढले नव्हते. परिणामी शिल्लक ऊसाचा प्रश्न उद्भवत नव्हता. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. शिवाय परिसरातील तेरणा, मांजरा यासह इतर छोट्या-मोठ्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली आहे. परिणामी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वात मोठा तेरणा साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आहे.
अजित पवारांची सूचना अचूक वेध घेणारी?
जिल्ह्यासह राज्यात अतिरिक्त ऊस होऊ शकतो. त्यासाठी जुने कोणते साखर कारखाने सुरु करावे लागतील. राज्यात जिल्हानिहाय किती ऊसाचे क्षेत्र आहे. किती टन ऊस उत्पादन होईल, याचा अंदाज घेण्यासाठी साखर आयुक्तांना सुचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील क्षेत्राचा अंदाज येणार आहे. राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे Social Justice Minister Dhananjay Munde यांनीही आंबा साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी तेरणा कारखाना सुरू व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत स्वतः पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी यासाठी पुढाकार घेऊन संभाव्य शिल्लक ऊसाचा प्रश्न सोडविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान तेरणा कारखाना सुरू करण्यात अपयश आले तर परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येणार आहे. तसेच तेरणा सुरू झाला तर जिल्ह्यातील इतरही साखर कारखाने सुतासारखे सरळ चालतात. अन्यथा अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होते. त्यासाठी तेरणा कारखाना सुरू होण्याची अपेक्षा शेकतरी वर्गातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.