तुळजापुरात ९७१ जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

Corona Vaccination News
Corona Vaccination News
Updated on
Summary

शहरातील नागरिकांनी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे लसीकरण चांगल्या पद्धतीने पार पडले.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर Tuljapur शहरात मागील आठवड्यापासून सुरू केलेल्या लसीकरण केंद्रात ९७१ नागरिकांनी कोरोना Corona प्रतिबंधक लसीकरण करून घेतले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली, रविवारी (ता.२७) येथील सिद्धी लॉजमध्ये श्री. रोचकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले उपस्थित होते. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी शहरामध्ये राबविण्यात आलेल्या विविध केंद्रातील लसीकरणाची माहिती शहरात दिली. शहरातील नागरिकांनी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे लसीकरण Corona Vaccination चांगल्या पद्धतीने पार पडले. शहरात अनेक नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना स्टीलच्या डब्याची भेटवस्तु दिली. त्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात आमदार राणाजगजितसिंह पाटील, विनोद गंगणे तसेच नगरसेवकांनी लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य केले. भविष्यात महिलांसाठी आणि अठरा वर्षांपुढील युवकांसाठी १० हजार लसी मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. osmanabad updates 971 people take corona vaccination in tuljapur

Corona Vaccination News
केंद्र सरकार जुमलेबाजीचे सरकार, काँग्रेसचा भाजपवर हल्ला

लसीकरण करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना यापूर्वी निवेदन देण्यात आले होते. वास्तविकपणे उपजिल्हा रुग्णालय, वीर तपस्वी केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र व्हावे अशी आमची सुरुवातीला मागणी होती. तथापि वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्र मिळाले त्याचा फायदा झालेला आहे, असा दावाही त्यांनी केला. यावेळी आनंद कंदले यांनी लसीकरणाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.