Latur News : वैद्यकीय महाविद्यालयांना ‘आउट सोर्सिंग’चा आधार; मराठवाड्यातील एक हजार ६३३ पदांचा समावेश

आरोग्य सेवा ही महत्त्वाची सेवा आहे. असे असताना शासनाचा मात्र अशा संस्थांत नियमित पदे भरण्यापेक्षा ‘आउट सोर्सिंग’द्वारे पदे भरण्यावर अधिक भर दिसत आहे. अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक, डॉक्टर देखील याच पद्धतीने कार्यरत आहेत.
outsourcing to medical colleges Including 1633 posts in Marathwada
outsourcing to medical colleges Including 1633 posts in MarathwadaSakal
Updated on

लातूर : राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. पण, मनुष्यबळच दिले जात नसल्याने या महाविद्यालयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

आता ती बाह्य स्रोतांद्वारे (आउट सोर्सिंग) भरली जाणार आहेत. या पद्धतीने राज्यातील ५९ संस्थांमध्ये सहा हजार ८३० पदे भरली जाणार असून त्यात मराठवाड्यातील सात संस्थांतील एक हजार ६३३ पदांचा समावेश आहे. ही पदे भरल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांना चांगला आधार मिळणार आहे.

कुशल, अकुशल पदे

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांसाठी गट ‘क’ व गट ‘ड’ या संर्वगातील मंजूर काल्पनिक पदे बाह्यस्रोतामार्फत भरली जाणार आहेत. अशा ५९ संस्थांत कुशल, अकुशल व अर्धकुशल अशी एकूण ६ हजार ८३० पदे भरली जाणार आहेत. त्याला शासनाने आता मान्यता दिली आहे.

नियमितपेक्षा ‘आउट सोर्सिंग’वर भर

आरोग्य सेवा ही महत्त्वाची सेवा आहे. असे असताना शासनाचा मात्र अशा संस्थांत नियमित पदे भरण्यापेक्षा ‘आउट सोर्सिंग’द्वारे पदे भरण्यावर अधिक भर दिसत आहे. अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक, डॉक्टर देखील याच पद्धतीने कार्यरत आहेत.

आता त्यात कुशल, अकुशलची भर पडत आहे. बाह्यास्रोताने सेवा उपलब्ध करून घेताना नियमितपणे पदे भरल्यावर शासनास जितका खर्च झाला त्याच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत होणे आवश्यक आहे. याची खातरजमा करूनच ही पदे भरावीत, तसाच करारनामा सेवा पुरवठादारांशी करावा, असे आदेशही शासनाने दिले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत ‘क’ व ‘ड’ वर्गातील पदे महत्त्वाची आहेत. गेली तीन-चार वर्षांपासून ही मंजूर पदे भरलेली नाहीत. मुदतवाढ देत काम करावे लागत होते. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता शासनाने ही पदे ‘आउट सोर्सिंग’द्वारे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्य पातळीवरूनच ही प्रक्रिया पूर्ण होईल. हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर अधिक चांगले काम करता येईल.

- डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()