पूर्णा येथील एन्ड्रस अँड हाऊसर कंपनीने दिले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

चुडावा येथे आयोजित कार्यक्रमात एन्ड्रस अँड हाऊसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चुडावा गावचे भुमिपूत्र कैलास देसाई यांनी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेला देखील एक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिले आहे
पूर्णा येथील कंपनीने दुिले आॅक्सीजन काॅन्सट्रेटर
पूर्णा येथील कंपनीने दुिले आॅक्सीजन काॅन्सट्रेटर
Updated on

पूर्णा ( जिल्हा परभणी ) : एन्ड्रस अँड हाऊसर कंपनीच्या वतीने राज्यात शंभर ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पोस्ट कोविड रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सुविधा मिळावी यासाठी देण्यात आले आहेत. अशी माहिती एन्ड्रस ॲंड हाऊसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास देसाई यांनी दिली.

परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज यांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पोस्ट कोविड रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सुविधा देण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. मागील पन्नास दिवसांत अनेक पोस्ट कोविड रुग्णांना त्याचा लाभ झाला आहे. या मशीनचा केवळ पोस्ट कोविड नव्हे तर सीओपीडी अर्थात क्रोनिक ऑबस्त्रकटीव्ह लंग डिसीजसारख्या फुफुसाच्या विकारांमध्ये देखील उपयोग होतो आहे. म्हणूनच आजही संस्थेच्या वतीने दिलेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर सतत व्यस्त असून त्यास मागणी देखील आहे.

हेही वाचा - हिंगोलीत सकाळी दहा ते रात्री आठपर्यत राहणार दुकाने सुरु; रुचेश जयवंशी

चुडावा येथे आयोजित कार्यक्रमात एन्ड्रस अँड हाऊसर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चुडावा गावचे भुमिपूत्र कैलास देसाई यांनी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेला देखील एक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन उपलब्ध करुन दिले आहे. तसेच एक मशीन चुडावा ग्रामपंचायत येथे देखील देण्यात आले. कैलास देसाई यांनी या प्रसंगी कोविड काळात केलेल्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली व भविष्यात देखील गरजू रुग्णांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी एचएआरसी टीमचे डॉ. पवन चांडक, राजेश्वर वासलवार, चंद्रकांत अमीलकंठवार, सरपंच श्रीधर देसाई, उपसरपंच सुभाष देसाई, अरुण पवळे, महादजी देसाई, गोविंद देसाई, शंकर देसाई, अंगुलीमाल सरपाते, गीताराम देसाई, ग्रामविकास अधिकारी एस. पी. राठोड, आनंदराव देसाई गुरुजी व ग्रामस्थ उपस्थीत होते.

येथे क्लिक करा - काकाला पुतण्याने वाचवले...विरोधी गटात असताना ऐनवेळी केली खेळी

कोविड काळात संपूर्ण महाराष्ट्रात १०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामीण भागात व शासकीय रुग्णालयात दिले असून, विविध ठिकाणी बाय पॅप व्हेंटिलेटर देखील दिले आहेत. त्याचा उपयोग होतो आहे यातच समाधान आहे. सामाजिक ऋणांतून थोडेसे उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे.

- कैलास देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, एंड्रस ॲंड हाऊसर कंपनी.

संपादन- प्रल्हाद कांबळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()