Pachod Crime: एटीएम कार्डची हेराफेरी करून गंडा घालणाऱ्याला दोन तासांत जेरबंद

Latest Crime News |एक पैठणच्या आय डि बी आय बँकेच्या एटीएम वरून पैसे काढण्याचे संदेश येऊ लागले.
Pachod Crime: एटीएम कार्डची हेराफेरी करून गंडा घालणाऱ्याला दोन तासांत जेरबंद
Updated on

एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी हातचलाकीने एटीएम कार्डाची हेराफेरी करून एका शेतकऱ्याला एक लाख ९९ हजार ९७१ रुपयांस गंडविल्याची घटना पाचोड (ता.पैठण) येथे रविवारी (ता.१७) दुपारी घडली असून पाचोड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविल्याने एका भामट्यास दोन तासांत जेरबंद करण्यास यश मिळाले. मनोजकुमार (वय ३४ वर्ष) रा. बार्शी (१३३) भिवानी (हरियाणा) या भामट्या विरुद्ध रात्री उशिरा पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.