पाचोड : गेल्या आठ वर्षांपासून विविध गुन्हयात हवे असलेल्या चौघा अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाणे हद्दीत खंडाळा (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.दहा) घडली..गेल्या आठ वर्षापासून चोरी, दरोडे, मारामाऱ्या आदी गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या चौघांजणाविरुद्ध पाचोड पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. परंतु ते गुन्हे दाखल झालेनंतर सलगरित्या पोलिसांना हुलकावणी देत होते. यांतील बापु रहेमान चव्हाण (वय ४५ वर्ष), प्रदिन उर्फ प्रदिप बापु चव्हाण (वय २१ वर्ष), अभिषेक भय्या चव्हाण (वय २० वर्ष) व यासीन पप्पु रहेमान चव्हाण, हे सर्व रा. खंडाळा (ता.पैठण) हे खंडाळा शिवारात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली असता त्यांनी छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) चे पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड, .अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सुनिल लांजेवार , पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांना या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपरोक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पाचोड पोलिसांना "कोम्बींग ऑपरेशन" च्या सुचना देऊन कार्यवाहीसाठी मार्गदर्शन केले.पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, स्थानिक गुन्हे शाखे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, सपोनि पवन इंगळे, पोलिस उपनिरीक्षक दगडू जाधव आदिंनी आपल्या सहकाऱ्या समवेत खंडाळा शिवारात कोंबिंग ऑपरेशन करून गत आठ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बापु रहेमान चव्हाण (वय ४५ वर्ष), प्रदिन उर्फ प्रदिप बापु चव्हाण (वय २१ वर्ष), अभिषेक भय्या चव्हाण (वय२०वर्ष) व यासीन पप्पु रहेमान चव्हाण, हे सर्व रा. खंडाळा (ता.पैठण) या चौघा जणांना जेरबंद केले. बापु चव्हाण हा गेल्या आठ वर्षापासून तर प्रदिन उर्फ प्रदिप चव्हाण दोन वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देत होते. .संबंधीतांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांचा ताफा पाहून परिसरातील अनेक कुख्यात भुमिगत झाले होते. पोलिसांनी केलेल्या या कोंबिंग ऑपरेशनमुळे परिसरात दबा धरून बसलेल्या अनेकांनी काही दिवसासाठी पोलिस ठाण्याची हद्द बदलण्याची कृलृप्ती लढवल्याचे समजते.या 'कोंबिंग ऑपरेशन' च्या कारवाईत गुन्हे शाखेचे सहय्यक फौजदार लहू थोटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव , वाल्मिक निकम,नरेंद्र खंदारे, संजय घुगे, पोलिस नाईक अशोक वाघ, महीला पोलिस हेड कॉन्स्टेबल मनिषा चौधरी, जनाबाई चव्हाण, विठ्ठल डोके, राहूल गायकवाड, विजय धुमाळ,अंगत तिडके, कैलास राठोड, संतोष पाटील, सुनिल खरात, संजय तांदळे संतोष डमाळे व श्री.शिरसाठ तर पाचोड पोलिस ठाण्याचे ताराचंद घडे,गणेश बोरकर, बाबुराव साबळे,फेरोझ बरडे,अन्वर बागवान आदींनी सहभाग घेतला. जेरबंद करण्यात आलेल्या संबंधीतांना पाचोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सपोनि शरदचंद्र रोडगे करीत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.