आडुळ - राज्यात परिवर्तन अटळ असुन येणारे सरकार हे महाविकास आघाडीचे असेल. शेतीमालाचे भाव कोसळलेले असुन बेरोजगारी, महिला सुरक्षेसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. राज्याच्या व तालुक्याच्या सर्वांगिन विकासासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असे अवाहान विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (ता.८) रोजी आडुळ येथे केले.