Chhatrapati Sambhajinagar: आडूळ येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना बस पासचे वाटप

राज्य परिवहन महामंडळाच्या पैठण आगाराच्या वतीने शुक्रवार (ता. ४ रोजी ) मासिक बस पासचे वाटप
Paithan Depot of the State Transport Corporation supports local students with bus passes
Paithan Depot of the State Transport Corporation supports local students with bus passes Sakal
Updated on

आडूळ : (ता.पैठण) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शाळा तेथे पास या उपक्रमांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पैठण आगाराच्या वतीने शुक्रवार (ता. ४ रोजी ) मासिक बस पासचे वाटप शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आडूळ या ठिकाणी एकमेव उच्च माध्यमिक शाळा असल्याने परिसरातील खेडयापाड्यातील असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी पायपीठ करावी लागत होती तसेच काही विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने दररोज प्रवास करावा लागत होता यामुळे त्यांचा वेळ वाया जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर ही याचा परिणाम होत होता. ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने याचा पाठपुरावा केल्याने आता हि समस्या मार्गी लागली आहे. गेवराई बु., देवगाव, रजापुर, थापटी तांडा, ब्राम्हणगांव, देवगांव तांडा, आडुळ तांडा, अब्दुलपुर, पिवळवाडी सह इतर गांवातुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता.४) रोजी मासिक पासचे प्रशालेत पहिल्यांदाच वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

Paithan Depot of the State Transport Corporation supports local students with bus passes
इलेक्ट्रिक बस गाड्यांची एसटी विभागाला प्रतीक्षा

शाळेतील शिक्षक अनिल चव्हाण, कैलास वाढवे यांनी एस टी प्रवासाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पैठण आगार प्रमुख गजानन मडके,वाहतूक निरीक्षक राजेंद्र कोलते,वाहतूक नियंत्रक रोहिदास सोंडगे,पाचोड येथील बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक सर्जेराव पठाडे,एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी हारुण पठाण,सुभान पठाण आदिंचे मुख्याध्यापिका ज्योती मादनकर यांनी आभार मानले व इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.या प्रसंगी शिक्षक नागेश चरपेलवार,मनिषा मार्कण्डेय,शिवनारायण काळे,जयसिंग राठोड,वैशाली तारो,नालंदा मगरे,गोपिका शिंदे अदिसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.