बीड - खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी (ता. दोन) संसदेतील पहिल्याच भाषणात जिल्ह्यातील ऊसतोड मजूर, जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नांचा उहापोह केला. ऊसतोड मजूरांसाठी विशेष तरतुद करण्याची मागणी त्यांनी केली.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असून ऊसतोड कामगारांच्या नावावर केवळ राजकारण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोग्य यंत्रणेला उभारी देण्यासाठी रिक्त जागा, अत्याधुनिक मशीनरी आणि रूग्णालये मंजूर करा, अशी मागणीही त्यांनी केली.
मजूर हातात कोयते घेऊन रात्रंदिवस शेतात ऊस तोडतात. त्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली. जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय, मोठे सरकारी इस्पितळ, आरोग्य केंद्र आहेत. परंतु या आरोग्य केंद्रांवरती पुरेसे मनुष्यबळ नाही. जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीची मागणीही त्यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालय झाले तर इथल्या गुणवान विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देतील. जिल्ह्याच्या ठिकाणी स्त्री रुग्णालयाचीही मागणी त्यांनी केली.
अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅनची मशीन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याने नवीन मशिन उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यात लिंग गुणोत्तरात एक हजार पुरुषांमागे ९३३ मुली आहेत. याला आरोग्यव्यवस्था कारणीभूत असल्याचे बजरंग सोनवणे म्हणाले.
मराठीत भाषण; पवार, जरांगेंना नमस्कार
बजरंग सोनवणे यांनी मराठीतून भाषण करताना त्यांनी माझी शेतकरी पुत्र अशी ओळख असल्याचे नमूद केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना नमस्कार करून त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे स्मरण करतो, अशी त्यांनी सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.