औंढा येथे महाशिवरात्रनिमित्त हरहर महादेवाच्या गजरात पालखी सोहळा 

file photo
file photo
Updated on

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : येथे महाशिवरात्र उत्सवानिमित्ते दरवर्षी  श्रीची पालखी सोहळा निघत असतो. कोरोनाच्या संकटामुळे महाशिवरात्र यात्रा रद्द झाली असली. तरीही श्री नागनाथ देवस्थानच्यावतीने देवस्थानचे कर्मचारी व पुजारी यांच्या साह्याने श्रीचा पालखी सोहळा शुक्रवारी (ता. १२) मंदिर प्रांगणातच झाला. 

सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे दिवसभर मंदिर सर्वसामान्य शिवभक्तांसाठी बंद होते. दरवर्षी सायंकाळी सात वाजता निघणारी श्रींची पालखी मिरवणूक मंदिरातून निघून गावात असलेल्या देवाचे मामा श्री रवळेश्वर मंदिराला भेट देत असते आणि पालखी पुन्हा मंदिरात परत येत असते. हा सोहळा सायंकाळी सहा ते बारा इतका वेळ चालतो परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये पालखीची मंदिराला फक्त प्रदक्षिणा करून थांबवण्यात आली. यावेळी इतर भाविकांना मंदिरामध्ये येण्यास प्रवेशबंदी होती. त्यामुळे नागनाथ संस्थांचे पुरोहीत, पुजारी आणि कर्मचारी यांच्या वतीने पालखी सोहळा पार पडला.

पालखी मिरवणूक गावांमधून रवळेश्वर मामांच्या मंदिराकडे जात असताना गावातील सौभाग्यवती महिला या पालखीला औक्षण करून ओवाळणी करत असतात. प्रत्येक दारामध्ये रांगोळी काढलेली असते. फुलांची पुष्पवृष्टी असते वाजत-गाजत मशालीच्या दिव्यांमध्ये हा आनंद नयनरम्य सोहळा पालखीचा दरवर्षी असतो. त्यामुळे वर्षातून देव ऐकदा आपल्या दारात येतात ही भावना प्रत्येक गावातील नागरिकांची असते. परंतु यावर्षी ही संधी कोरनामुळे कुठल्याही भाविकांना मिळाली नाही. त्यामुळे गावात शुकशुकाट जाणवत होता आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती. यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, बापुराव देशमुख, कृष्णा पाटील,नागेश माने, मुख्यपुजारी श्रीपाद भोपी, आदित्य भोपी, शेखर भोपी, राजू गोरे, रमेश शिरसागर, दीपक बोडके, बाबा गोरेसह मंदिरातील कर्मचारी सुरक्षा गार्ड आदी या श्रीचा पालखी प्रसंगी हजर होते. हर हर महादेव चा गजरामध्ये ही पालखी मंदिराच्या प्रांगणामध्ये काढण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()