Pankaja Munde News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आखणी; पुनर्वसनासाठी पंकजा मुंडेंना केंद्रात संधी?

नेत्या पंकजा मुंडे यांच्याच जागेचा पेच असेल तर आपले काय, असा पेच त्यांच्या समर्थक नेत्यांमध्ये आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesakal
Updated on

Beed News : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वारंवार संधी टाळलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्रात संधी मिळणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

पंकजा मुंडे यांची राज्य भाजपने आतापर्यंत कोंडी केली असली तरी आगामी लोकसभेच्या दृष्टीने भाजपला ते परवडणारे नसल्याने आता त्यांना केंद्रात संधी देण्याबाबत एकविचार झाल्याची माहिती आहे.

२०१४ साली लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेचा भाजपच्या विजयाला मोठा हातभार लागला.

Pankaja Munde
Pankaja Munde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही; पंंकजा मुंडेंचं मराठा अस्त्र?

मात्र, पंकजा मुंडे यांचे पुढे जात असलेले नेतृत्व भाजपच्या राज्यातील नेत्यांना नकोसे होते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेणे, त्यांच्या खात्यात न ऐकणारे अधिकारी देणे, त्यांच्या राजकीय विरोधकांना मदत करणे असे अनेक प्रयत्न झाल्याचा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

दरम्यान, २०१९ साली पंकजा मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. या पराभवात भाजपमधील पंकजा मुंडे यांच्या विरोधकांनी हातभार लावल्याचाही समर्थकांचा आरोप कायम आहे. तसेच, यानंतर राज्यसभा, विधानपरिषद आदी संविधानिक पदांवर पंकजा मुंडे यांना टाळले गेले. अगदी त्यांचे कार्यकर्ते राहिलेल्यांना संधी मिळाली.

पण पंकजा यांना डावलल्याने समर्थकांमधील संताप आजही कायम आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराजीला अनेकदा जाहीर सभांमधून वाट काढून दिली आहे. राज्यातील भाजप नेत्यांचे नेतृत्व मान्य करण्याचे त्यांनी सपशेल टाळले असून आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहाच असल्याचेही त्यांनी निक्षुन सांगितले आहे.

गेल्याच महिन्यात आपल्याबाबत काय निर्णय याची विचारणा अमित शहा यांना करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. आमच्यात नाराजी नसल्याचे दोन्ही बाजूंनी सांगितले जात असले तरी पंकजा मुंडे व राज्य भाजप नेत्यांमधील बेबनाव लपून नाही.

Pankaja Munde
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा विधानसभेचा मार्ग खडतर?

लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार!

नेत्या पंकजा मुंडे यांच्याच जागेचा पेच असेल तर आपले काय, असा पेच त्यांच्या समर्थक नेत्यांमध्ये आहे. मात्र, आतापर्यंत टाळलेल्या पंकजा मुंडे यांची नाराजी भाजपला आगामी लोकसभेला परवडणारी नसल्याचा सुरही भाजपच्या एका गोटातून निघत आहे.

त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत शिक्कामोर्तब होऊन त्यांना केंद्रात मंत्रीपद देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांना संधी दिली जाणार आहे.

पेच नेतृत्वाचा

पंकजा मुंडे यांना केंद्रात संधी म्हणजे त्यांचे पुनर्वसन असाच थेट अर्थ आहे. मात्र, पंकजा मुंडे या भाजपमधील मास लिडर व ओबीसी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. अलिकडे त्यांना राज्य भाजपमधील सर्व प्रक्रियेपासून दुर ठेवले जात आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद देणे म्हणजे आगामी काळात परळीची जागा त्यांना नाही, असाच अर्थ. त्यांची सोय झाली तरी मग त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नेत्यांचे काय? असाही प्रश्न आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde: पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानामुळं चर्चांना उधाण

परळी मतदारसंघात संधी कोणाला?

पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेश भाजपचे सहप्रभारीपद असून या चार वर्षांत त्यांना राज्याच्या भाजप प्रक्रेयपासून हळुहळू दुर केले जात असल्याचे स्पष्ट आहे. अगदी अलिकडे मराठवाड्यातील भाजपचे कार्यक्रम देखील पंकजा मुंडे यांच्या अपरोक्षच होत आहे.

आता तर राज्यात नवीन राजकीय समीकरणात जिल्ह्यातीलच त्यांचे राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटले आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढविण्याची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या परळी मतदारसंघात संधी कोणाला हाच मोठा पेच निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.