Pankaja Munde : ‘जीएसटी’ रकमेसाठी पुढाकार; पण कर्जाचे काय ?

दुष्काळासह व्यवस्थापनातील काही त्रुटींमुळे कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली आहे.
pankaja munde
pankaja munde sakal
Updated on

बीड - भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला थकीत जीएसटी रकमेवरून जप्तीची नोटीस आली आहे. या कारवाईवरून पंकजा समर्थक सरकारविरोधात चांगलेच संतापले आहेत. कारखान्यावरील जीएसटी रकमेसाठी अनेक समर्थकांनी एक लाख रुपयांपासून ५० लाखांपर्यंत मदतीचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने लिहिले आहेत. कारखान्यावरील जीएसटी रकमेसाठी समर्थक पुढे आले असले तरी कारखान्यावरील इतर कर्जांचे काय, असा प्रश्न कायम आहे.

वैद्यनाथ कारखान्यावर १९ कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकल्याने जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याच्या काही मालमत्तांवर जप्तीची नोटीस बजावून कारवाई सुरू केली आहे. मात्र, या मालमत्तांवर पूर्वीच काही बँकांचे कर्ज थकलेले असल्याने याच मालमत्तांवर जप्तीची कारवाई बॅंकांनी सुरू केली आहे.

दरम्यान, जीएसटी आयुक्तालयाच्या कारवाईवरून मुंडे समर्थक सरकारवर चांगलेच संतापले आहेत. त्यात केंद्र सरकारने इतर सहकारी साखर कारखान्यांना मदत केली असताना मुंडेंच्या ‘वैद्यनाथ’ला वगळले आहे.

pankaja munde
Tanaji Sawant: बाळासाहेब-वाजपेयींना मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली, सावंतांची आत्मस्तुती

या दोन्ही मुद्द्यांवर पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडत कारखान्याची आर्थिक अडचण, त्यांचे सुरू असलेले प्रयत्न आणि ही अडचण का आली, याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. याच मुद्द्यावर मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त केला. समर्थकांनी ५० लाख रुपयांपर्यंत मदतीसाठी हात पुढे केले आहेत. मदतीच्या रकमेचे धनादेश गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावे लिहून तयार ठेवले आहेत. काही समर्थकांनी तर केवळ स्वाक्षऱ्या करून धनादेश लिहिले असून त्यावर पंकजा मुंडे जी रक्कम लिहतील, ती मान्य असेल, असे म्हटले आहे.

pankaja munde
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

व्यवस्थापनातील त्रुटींमुळे कर्ज

दुष्काळासह व्यवस्थापनातील काही त्रुटींमुळे कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली आहे. विविध बँकांचे कारखान्यावर मोठे कर्ज आहे. आता समर्थकांकडून जीएसटी रकमेसाठी वर्गणी केली जात असली तरी कारखान्यावर इतर बँकांच्या थकलेल्या कर्जाची फेड कशी करायची, असा पेच कायम राहणार आहे. कर्जाची रक्कम मोठी आहे. कारखान्याला केंद्र सरकारची मदतही मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.