Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचा विधानसभेचा मार्ग खडतर?

राजकीय ः कार्यकर्ते पडले संभ्रमात, धनंजय मुंडेंना मंत्रिपद
Pankaja Munde
Pankaja MundeSakal
Updated on

परळी वैजनाथ : परळी विधानसभा मतदारसंघ हायप्रोफाईल लढतीमुळे सातत्याने चर्चेत असतो. हा मतदारसंघ भाजपचे राष्ट्रीय नेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे वर्चस्व असलेला असून या मतदारसंघाचे नेतृत्व गोपीनाथराव मुंडेंच्या पश्‍चात पंकजा मुंडे यांनी केले.

मात्र २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभेत पंकजा मुंडे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारसंघावर चांगली पकड निर्माण केली.

सध्याच्या राजकीय घडामोडीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोण, कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? पंकजा मुंडे यांचे काय होणार? या चर्चा रंगल्या आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये निर्माण झाला. या अगोदर परळी मतदारसंघाचा काही भाग रेणापूर (जिल्हा लातूर) व माजलगाव (जिल्हा बीड) या मतदारसंघात विभागलेला होता.

Pankaja Munde
Pankaja Munde: मुंडे बंधू-भगिनी एकत्र येणार? भविष्यात काहीही होऊ शकते...; पंकजांचे सूचक विधान

२००९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघाची पहिल्यांदा निवडणूक झाली व यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे विजयी झाल्या. त्या सलग दोनदा परळी विधानसभा मतदासंघातून निवडून आल्या. पण २०१९ मध्ये त्यांना बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुरावा निर्माण झाला. पराभवानंतर त्यांना पक्षाने पुन्हा महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही संधी दिली नाही. उलट त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या समर्थकांना विधान परिषद, राज्यसभेवर संधी दिली गेली.

यानंतर पंकजा मुंडे सातत्याने महाराष्ट्रातील पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले.

धनंजय मुंडे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा त्यांच्याबाबत सुरू झाल्या. पण मध्येच अजित पवार यांनी आपल्या काकांविरोधात बंड करत उपमुख्यमंत्री पदाची व धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.

अजित पवार भाजप सोबत आल्याने व आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या.

Pankaja Munde
Pankaja Munde : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही; पंंकजा मुंडेंचं मराठा अस्त्र?

कारण येणाऱ्या सर्व निवडणूका भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एकत्र लढवणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केले. यात परळी विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहतो की भाजपकडे येतो यावर पुढील सर्व गणिते अवलंबून आहेत.

सध्या परळी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा तेच निवडणूक लढवणार असतील तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे काय? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे.

Pankaja Munde
NCP Political Crisis : मुंबईतील आजच्या बैठकींना राष्ट्रवादीचे दोन्ही गट जाणार

पंकजा मुंडे यांनी तर काही दिवसांपूर्वीच मी निवडणूक लढणार असून ती संपूर्ण ताकतीने लढणार असल्याचे बीड येथील एका कार्यक्रमात सांगितले आहे. आता या बदललेल्या परिस्थितीत या घोषणेचे काय होणार अशीही चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

तसेच महाराष्ट्रातील घडत असलेल्या राजकीय घडामोडींबाबत अनेक राजकीय पक्षाचे नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. पण पंकजा मुंडे यांनी मात्र या सर्व घडामोडी संदर्भात मौन धरले आहे. यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.

भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

महाराष्ट्रात अजित पवार यांनी राजकीय भूकंप घडवत अचानक भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले.

Pankaja Munde
Ajit Pawar: 'गडी एकटा निघाला...83 वर्षाचा योद्धा...', अजित पवारांच्या वाटेत शरद पवारांचे बॅनर

सोबत आलेल्या आमदारांपैकी काही जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पैकी एक असलेले आमदार धनंजय मुंडे यांनी दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र त्यांच्या कट्टर विरोधक राहिलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना याचा धक्काच बसला.

धनंजय मुंडे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघात सुरू होती. वैद्यनाथ कारखान्याची झालेली बिनविरोध निवडणूक ही एकत्र येण्याची नांदी समजली जात होती.

मात्र त्यापूर्वी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यापैकी विधानसभेला कोण व लोकसभेला कोण? याचे निर्णय होतील अशी अपेक्षा दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना होती.

Pankaja Munde
Maharashtra Politcs: महाराष्ट्राच्या राजकारणावर पटोलेंनी मांडली काँग्रेसची भूमिका! म्हणाले...

मात्र अचानक घडलेल्या घडामोडींमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले आहेत. सत्तानाट्य घडून दोन दिवस उलटून गेले तरी अजूनही पंकजा मुंडे या मौन बाळगून आहेत. तर कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत आगामी काळात जुळवून घ्यावे लागणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांत नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.