पाटोदा : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या येथील जवान शेख तौसिफ यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी (ता. 10) पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. सरकार या कुटूंबियांच्या पाठीशी असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फेही मदत करण्याचा विश्वास देऊन श्रीमती मुंडे यांनी कुटूंबियांना धीर दिला.
गडचिरोली जिल्हयात ता. एक मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शेख तौसिफ शेख आरेफ हे शहीद झाले. सरकार त्यांच्या कुटूंबियांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असे सांगून नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,हा जिल्हा त्यांचे बलिदान व शौर्य कदापि विसरणार नाही अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी या कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शेख तौसिफ यांचे वडील शेख आरेफ, आई, भाऊ तसेच आमदार भीमराव धोंडे, आमदार सुरेश धस, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राजेंद्र मस्के, संतोष हंगे, सुधीर घुमरे, राजेंद्र बांगर उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.