Beed Loksabha Election: बीडमध्ये पंकजा मुंडे विरूध्द बजरंग सोनवणे; निवडणुकीत मुद्दे पटवून देताना उमेदवारांच्या नाकीनऊ

Beed Loksabha Election: बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. आपण लोकसभा लढविणार नाही, असे दोनच महिन्यांपूर्वी निक्षून सांगणाऱ्या पंकजा मुंडेंना भाजपने रिंगणात उतरविले.
Beed Loksabha Election
Beed Loksabha ElectionEsakal
Updated on

Beed Loksabha Election: लोकसभेच्या बीड मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, दोन वेळा खासदार राहिलेल्या त्यांच्या भगिनी, डॉ. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी का टाळली, आपल्याला का मिळाली, हे पटवून देताना त्यांच्या नाकीनऊ येताहेत. हीच गत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेंचीही आहे. पाच वर्षे जिल्ह्यात का फिरकला नाहीत, असा सवाल त्यांना विरोधक करत आहेत.

बीड मतदारसंघावर २००९ पासून भाजपचे वर्चस्व आहे. आपण लोकसभा लढविणार नाही, असे दोनच महिन्यांपूर्वी निक्षून सांगणाऱ्या पंकजा मुंडेंना भाजपने रिंगणात उतरविले. त्यामुळे डॉ. प्रीतम मुंडेंची उमेदवारी का टाळली, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही सतावत आहे आणि विरोधकांचाही बनला मुद्दा आहे. महायुतीत परळीतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा, गेवराईतून भाजपचे लक्ष्मण पवार, माजलगावमधून ‘राष्ट्रवादी’चे प्रकाश सोळंके व आष्टीतून बाळासाहेब आजबे यांच्यासह विधान परिषदेचे सुरेश धस असे एका मंत्र्यांसह सहा आमदार, एक खासदार पंकजा मुंडेंसाठी मैदानात आहेत.

सत्ता, नेत्यांची फौज असली तरी विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात लढलेले आणि पुन्हा लढायचे असल्याने या नेत्यांत एकसूर नसणे, विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचा जिल्ह्याशी कमी झालेला संपर्क, बंद पडलेला वैद्यनाथ कारखाना आदी बाबी त्यांच्यासाठी कळीचे मुद्दे आहेत.

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार असलेल्या सोनवणेंच्या मागे केवळ या पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर एकमेव आमदार आहेत. इतर माजी आमदार तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर त्यांची भिस्त आहे. या नेत्यांची मोट बांधून टिकवून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे. ‘वंचित’ने अशोक हिंगे यांना रिंगणात उतरविले आहे.

Beed Loksabha Election
पोलिस भरतीची मोठी बातमी! एका जागेसाठी 102 उमेदवार; जागा 17,471 अन्‌ अर्ज 17.76 लाख; 20 मेनंतर मैदानी चाचणी; उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी

जिल्ह्यात २० वर्षांत नवीन औद्योगिक वसाहत तर दूरच आहे. एकेक उद्योग बंद पडत आहेत. नगर - बीड - परळी रेल्वेमार्गही अपूर्णच आहे. जिल्ह्यात झालेले महामार्ग अरुंद झाल्याने मृत्यूचे सापळे बनले आहेत. आता प्रचारात पुन्हा दळणवळण, रोजगार निर्मितीचे उद्योग आणण्याची आश्वासने दिली जात आहेत.

सामाजिक समीकरणेही महत्वाची

एकवीस लाखांवर मतदार असलेल्या बीड जिल्ह्यात मराठा समाज सर्वाधिक आहे. त्यामुळेच अंतरवाली सराटी येथील आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद जिल्ह्यात उमटले. आंदोलनाचे दोनशेंच्या आसपास गुन्हे नोंद झाल्याने समाजात संताप आहे. या खालोखाल ओबीसींची विविध प्रवर्गांचे मतदान आहे.

Beed Loksabha Election
Fact Check: राहुल गांधींनी तरुणांना एक-एक लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं नाही! दिशाभूल करणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

दलित, मुस्लिमांच्या मतांची संख्याही तीन लाखांवर आहे. पंकजा मुंडेंची ओबीसी आंदोलनातील अनुपस्थितीचा मुद्दाही समाजातील घटकांत चर्चिला जातोय. अगदी महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या नेमणुकांत इतर ओबीसी कुठे आहेत, हा मुद्दाही सोशल मिडीयातून पुढे आला. पंकजा मुंडेंच्या बाजूने मराठा समाजातील धस, आजबे, पंडित, पवार, रमेश आडसकर अशी दिग्गज मंडळी आहे. ओबीसींची एकमूठ तसेच मराठा व दलित - मुस्लिम मतांचे धुव्रीकरण यावर बरेच काही अवलंबून आहे.

Beed Loksabha Election
NCP Declaration : सन्माननिधीत आणि पीकविम्याच्या व्याप्तीत वाढ करू ; अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीरनाम्यात आश्‍वासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.