- धनंजय शेटे
भूम - महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी खेचून आणण्यासाठी धमक लागते असे महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजी सावंत बोलत होते. परंडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रचाराची प्रचार सांगता सभा भूम नगर परिषदेसमोर संपन्न झाली.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, शिवाजी भोईटे, महादेव दादा अंधारे, संयोगिताताई गाढवे, अर्चना दराडे, अण्णासाहेब देशमुख, बाळासाहेब पाटील, धनंजय सावंत, संजय बनसोडे, संजय साबळे, बालाजी गुंजाळ, समाधान जाधव, निलेश शेळवणे, युवराज कांबळे, सागर खराडे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.