परभणी : परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणुचे संशयीत म्हणून तब्बल २४१ जणांची नोंद झाली असून त्यापैकी स्वॅब घेण्यात आलेल्या १९१ पैकी १७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवारी (ता.पाच) दाखल तीन संशयीयतांचे स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
आतापर्यंत परभणी जिल्ह्यात २४१ संशयीतांची नोंद झाली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात सध्या ६ जणांची रवानगी करण्यात आली आहे. तर १६२ जणांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे. तर ७३ संशयीतांनी विलगीकरणाचा कालवाधी पूर्ण केला आहे.२४१ संशयीतामध्ये परदेशातून आलेले ६१ जण असून त्यांच्या संपर्कात आलेले ६ लोक आहेत.या सर्वांना प्रशासनाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एकुण १९१ संशयीतांचे स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणु संस्थेकडे पाठवले असता त्यापैकी १७१ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर ४ स्वॅबचा अहवाल प्रलंबीत आहे. तर १६ स्वॅबची तपासणीची गरज नसल्याचा निर्वाळा पुणे येथील राष्ट्रीय विषाणु संस्थेने दिला आहे.
हेही वाचा - लॉकडाउनमध्ये घरफोडी !
रविवारी पाठवले ३ स्वॅब
संशयीतामध्ये घट झाली असून रविवारी ३ जण संशयीत म्हणून रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वांचे स्वॅब औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहीती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
हेही वाचा ...
‘त्या’ व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह
पाथरी (जि.परभणी) : दिल्लीतील तबलिकी जमातच्या धार्मिक कार्यक्रमास गेलेल्या शहरातील एका व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे पाथरीकरांना दिलासा मिळाला आहे.
सदरील व्यक्तीला ता.तीन मार्च रोजी ग्रामीण रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात भरती केले होते. तर आरेाग्य विभागातर्फे त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल ता.पाच मार्च रोजी प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ यांनी दिली.
हेही वाचा - जलसंधारणामुळे दुष्काळी गावातील बहरल्या फळबागा
हेही वाचा ...
सोनपेठला बाराजण अलगिकरन कक्षात
सोनपेठ (जि.परभणी) : येथील ईस्तेमाच्या तयारीसाठी आलेल्या परराज्यातील बाराजणांना अलगिकरन कक्षात ठेवण्यात आले असून त्यापैकी दोन जणांचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला आहे.
सोनपेठ शहरात मार्च महिन्यात हिंगोली व परभणी जिल्हा पातळीवर मुस्लिम बांधवांच्या ईस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. या ईस्तेमाच्या तयारीसाठी तेलंगणा येथील काही जण दोन महिन्यांपूर्वी सोनपेठ शहरात दाखल झाले होते. हा कार्यक्रम रद्द असून परंतु परप्रांतीय व्यक्ती शहरातच राहीले. नागरिकांनी याबाबत प्रशासनाला माहीती दिल्यानंतर सदरच्या बाराजणांना ग्रामीण रुग्णालयातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यातील एक वयोवृद्ध नागरिक तसेच एका युवकाला सर्दी व खोकल्याची लागण असल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.