परभणी : शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाने आक्रमक भूमिका घेतली असून, रविवारी (ता. नऊ) जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानित शाळा, तुकड्यांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने रविवारी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या धडक मोर्चा सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यातील शाळांचे शेकडो शिक्षक गांधी टोपी घालून या मोर्चात सहभागी झाले. मोर्चात नेतृत्व संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणिस राजकुमार, कदम यांनी केले. प्रचंड घोषणाबाजी करीत व शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील मैदानावर पोचला.
तिथे अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलीत अनुदान सूत्रानुसार अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी संपवावी, राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०,३० अशा तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, शिक्षक पाल्यांना विहित दराने अर्थसहाय्य करणारा १६ मार्च २०२१ चा शासन आदेश रद्द करून सर्व स्तरावरील मोफत शिक्षणाचा आदेश लागू करावा, सर्व शैक्षणिक संस्थांचे वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाप्रमाणे द्यावे या व अन्य मागण्यांबाबत शिक्षक नेत्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी जिल्हा मार्गदर्शक यू. आर. थोंबाळ, बी. टी. सांगळे, बी. एस. पूर्णे, विभागीय उपाध्यक्ष जी.डी. पोले, विक्रम कदम, आर. एन. सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव एन. टी. कदम यांची उपस्थिती होती. राज्य संस्थाचालक महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांनीदेखील या मोर्चात सहभाग नोंदवून शिक्षकांच्या न्याय मागण्यासाठी शासन दरबारी संस्थाचालक संघ पाठपुरावा करेल, असे आवश्वासन दिले. मोर्चासाठी पी. एस. जाधव, के. एस. वसेकर, एन. एस. हाके, डी. के. देवकते, बी. यू. फड, राजेश्वर जाधव, शिवाजीराव गुट्टे, माधवराव शिंदे आदींनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.