परभणी : वाळू वाहतूक करणाऱ्या गाढवावर महसूलची कारवाई

गोदावरी नदीच्या पात्रातून दिवस-रात्र मजुरांच्या साह्याने वाळू उपसा
PARBHANI
PARBHANISAKAL
Updated on

गंगाखेड : गोदावरी नदीच्या पात्रातून दिवस-रात्र मजुरांच्या साह्याने वाळू उपसा करून गाढवावरून वाहतूक केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार सुनील कांबळे यांनी शहरालगत असलेल्या गोदावरी नदी पात्रातुन अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाढवांना (ता.२१) जुलै रोजी ताब्यात घेतले.

तालुक्यातील वाळू घाटाच्या लिलावाची मुदत संपली आहे. परंतु मजुराच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा आजही सुरू आहे. या बाबीची माहिती नायब तहसीलदार सुनील कांबळे यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी (ता.२१) जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रा जवळ वाळू वाहतूक करणाऱ्या चार गाढवांना ताब्यात घेऊन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. सदरील कार्यवाही नायब तहसीलदार सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुनील काकडे, यशवंत सोडगीर, तलाठी अक्षय नेमाडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.