Parbhani : ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले ; कळमनुरी तालुक्यातील चित्र, रुग्णालयांत गर्दी

वातावरणातील बदलांमुळे अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे.
parbhani
parbhani sakal
Updated on

कळमनुरी - मागील आठवड्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात बदल झाला. परिणामी, तालुक्यात ताप, सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणेच खासगी रुग्णालयामध्येही रुग्णांनी उपचार घेण्याकरिता गर्दी केली आहे.

वातावरणातील बदलांमुळे अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिंका येतात. सध्या वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीही आजारी पडत आहेत. शहरातील सर्व खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यात डेंगीची लक्षणे असलेले रुग्णही आहेत.

रुग्णांच्या रक्तामधील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट कमी होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी बाह्य रुग्ण विभागामध्ये रोज किमान ५५० रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले जात आहेत.

parbhani
Beed : जिल्हा नियोजनच्या निधीची चावी सावेंकडेच ; १४ तारखेला बैठक ४१० कोटींच्या निधीचे होणार नियोजन

धूर फवारणीची मागणी

शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष देऊन धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे. शिवाय नागरिकांनीही आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये.

parbhani
Jalna News : पावसाळा संपला तरी प्रकल्प तहानलेले ; जिल्ह्यात केवळ ८.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा

डॉक्टर म्हणतात...

आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार तसेच हिंग, धने, जिरे, तेजपत्ता यांसारख्या मसाल्यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन वाढवावे, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्या जाणवत आहेत. अशा परिस्थितीत योग्य आहार, विहारासह पाणीही उकळून प्यावे असा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. दिवसभर कोमट पाणी घ्यावे याचबरोबर थंड पदार्थांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()