Parbhani : साडेचार लाखांच्या रकमेसह गांजा जप्त

परभणी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
police
policesakal
Updated on

परभणी : शहरातील भीमनगर परिसरात पोलिसांनी मंगळवारी, ता. ३१ जानेवारी रोजी रात्री केलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान साडेचार लाखांच्या रोख रकमेसह ४९ हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये गांजा, अवैध दारू यावर छापा मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ता. ३१ जानेवारी रोजी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, महिला सुरक्षा शाखा, अमानवी वाहतूक प्रतिबंधक पथक, पोलिस मुख्यालय, जलद प्रतिसाद पथक, स्थानिक पोलिस ठाणे यांनी ही कारवाई संयुक्तरित्या केली.

दरम्यान, अवैध गांजा विक्री करणाऱ्या लोकांची माहिती काढत असताना माहिती मिळाल्यावरून भीमनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेसह शेख रफीक शेख दस्तगीर, शेख जावेद शेख दस्तगीर यांच्या घरी छापा मारण्यात आला. त्यांच्याजवळून ४९ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ऑपरेशन दरम्यान अवैध गांजाचा शोध घेत असतांना माहिती मिळाल्यावरून शेख अमीर शेख ताहेर (रा. रमाबाई आंबेडकरनगर) यांच्या घराची झडती घेतली असती त्यांच्या घरात ४ लाख ५८ हजार ४०० रुपये सापडले. या पैशाची विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()