परभणी : जेईई- नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कॉग्रेस रस्त्यावर 

file photo
file photo
Updated on

परभणी ः कोरोनाचे संकट लक्षात घेता जेईई - नीट परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी कॉग्रेसच्यावतीने शुक्रवारी (ता. २८) निदर्शने करण्यात आली. त्यानंतर कॉग्रेस कमिटीच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले.

देशभरात कोरोना विषाणुचे संक्रमण अजूनही कायम असून हा धोका कमी झालेला नाही. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी गर्दी टाळणे हा एक महत्वाचा उपाय सरकारने सुचविलेला आहे. गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता लक्षात घेवूनच आपण गणेशोत्सव, दहीहंडीसारखे सण साधेपणाने साजरे केले आहेत. देशभरात आजही गंभीर परिस्थिती आहे. अशावेळी लाखो विद्यार्थांना जेईई - नीट ची परीक्षा देण्यासाठी आग्रह करणे हे संयुक्तिक नाही असे कॉग्रेसचे म्हणणे आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहतुक व्यवस्था नाही. एका परीक्षा केंद्रात शेकडो विद्यार्थी, परीक्षा घेण्यासाठी लागणारे शिक्षक व इतरशिक्षकेत्तर कर्मचारी एकत्र आल्यास कोरोना संक्रमण होण्यााची भिती आहे.

केंद्र सरकार विरोधात घोषणा ही देण्यात आल्या

हे लक्षात घेवून केंद्र सरकारने लाखो विद्यार्थी, पालक व परीक्षेशी निगडीत इतर घटकांच्या आरोग्य व भवितव्याचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा कॉग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कॉग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात केंद्र सरकार विरोधात घोषणा ही देण्यात आल्या. त्यानंतर कॉग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना भेटले. त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना सादर केले. या आंदोलनात नदीम इनामादर, पंजाबराव देशमुख, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख, श्रीकांत पाटील, सचिन जवंजाळ, अकबर जहागिरदार, सुरेश काळे, श्रीनिवास पेदापल्ली, सत्तार पटेल, शेख मतीन, दिगंबर खरवडे, खदीर लाला हाश्मी, सलील तांबळी, राजेश रेंगे यांच्यासह कॉग्रेसचे इतर कार्यक्रर्ते उपस्थित होते.

काय म्हणतात काॅंग्रेसचे पुढारी

केंद्र सरकारने परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या कोरोना महामारीच्या काळात हा निर्णय म्हणजे साथरोगाला आमंत्रण देण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे हजारो विद्यार्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा निर्णय माघे घ्यावा.

- आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष, कॉग्रेस

कोरोना विषाणुच्या संक्रमणाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. अश्या परिस्थितीमध्ये हजारो विद्यार्थांना एकत्र बोलावून त्यांचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार आहे. हा निर्णय तातडीने  मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे.

- नदीम इनामादर, शहर जिल्हाध्यक्ष, कॉग्रेस

कोरोना काळात केंद्र सरकार स्वताच सोशल डिस्टसिंगचा वापर करा असे आवाहन करत आहे. मग परीक्षा घेतांना हजारो विद्यार्थी, त्यांचे पालक हे परीक्षा केंद्रावर जमणारच आहेत. यातून कोरोनाचा प्रसार होण्याची भिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे.

- पंजाबराव देशमुख, तालुकाध्यक्ष, कॉग्रेस

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.