Parbhani News: नव्या शैक्षणिक वर्षापासून ‘मेडिकल’साठी प्रवेश

आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा विधान परिषदेत प्रश्न, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
Parbhani News
Parbhani Newssakal
Updated on

परभणी : परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासंदर्भात नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाराज यांनी विधान परिषदेतून दिली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या आज दिलेल्या उत्तरामुळे परभणीकरांची मागणी पूर्ण होताना दिसत आहे.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी परभणीकरांनी मोठा लढा उभारला होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी सरकार दरबारी आवाज उठविला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. परंतु, महाविद्यालयात विद्यार्थांना प्रवेश केव्हा मिळणार, याची माहिती दिली जात नव्हती. आता येत्या वर्षात एमबीबीएससाठी प्रथम वर्षाचे प्रवेश होणार असल्याची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.

आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणी संदर्भात प्रश्‍न मांडले होते.

बाबाजानी दुर्राणींनी विचारलेले प्रश्न

शहरातील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने सन २०२२ मध्ये वा त्या दरम्यान आदेश जारी केला आहे का?

लागणाऱ्या निधीची तरतूद केली का? इमारत बांधकाम व प्रत्यक्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे तसेच आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया याबाबत शासनाने चौकशी करुन कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे का?

गिरीश महाराज यांनी दिलेली उत्तरे

परभणी येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून स्थापन करण्यासंदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज सादर केला आहे.

परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, इमारत बांधकाम याबाबत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या स्तरावर कारवाई सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.