Parbhani : परभणीचे खासदार संजय जाधव यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची सुपारी

जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांसह गृहमंत्र्याकडे तक्रार
sanjay jadhav
sanjay jadhavsakal
Updated on

परभणी : येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी एका गॅंगला सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वत: खासदार संजय जाधव यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. खासदार संजय जाधव यांना यापूर्वीही नांदेड येथील रिंधा गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी आली होती.

परभणीचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय जाधव यांना दोन दिवसापूर्वी एका फोनद्वारे माहिती मिळाली होती. त्या फोनवरून खबऱ्याने त्यांना आपणास जीवे मारण्यासाठी ३ कोटी रुपयांची सुपारी देऊ केली असल्याचे खासदार संजय जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.

sanjay jadhav
Sambhaji nagar : RTE अर्ज भरण्याची आज शेवटची संधी

या संदर्भात आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधिक्षक रागुसधा आर. यांच्याकडेही या संदर्भात आपण बोललो असल्याचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले. आपले कुणाशीही वैर नाही. कुणाच्या व्यवहारात आपला

sanjay jadhav
Sambhaji nagar : चौकशीनंतर परतल्या उपायुक्त अपर्णा थेटे

हस्तक्षेप नाही असे असतांनाही आपण कुणावर संशय घ्यावा हा प्रश्न असल्याचे ही खासदा संजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान, खासदार संजय जाधव हे गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. सलग

दोन वेळा परभणी विधानसभेचे आमदार व नंतर सलग दुसऱ्यांदा परभणी लोकसभेचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याचे वृत्त शहरात हवे सारखे पसरले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()