परभणी महापालिका निवडणुकीत रासप प्रणित पॅनलची एंट्री : आमदार गुट्टे

परभणी महापालिका निवडणुकीचे वेध
Ratnakar Gutte
Ratnakar Gutteesakal
Updated on

परभणी : परभणी महापालिका निवडणुकीचे (Parbhani Municipal Corporation Election) वेध लागले असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (Rashtriya Samaj Paksh) व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल उभा केला जाणार आहे. स्वच्छ प्रतिमा व काम करण्याची जिद्द असलेल्या उमेदवारांना पॅनलद्वारे निवडणुकीची संधी देऊन संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविली जाईल, अशी माहिती गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे ( MLA Ratnakar Gutte) यांनी गुरुवारी (ता.दोन) पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेतील काँग्रेसचे (Congress Party) नगरसेवक सचिन देशमुख यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसकडे दिला आहे. सत्ताधारी काँग्रेस लोकहिताची कामे करत नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे सांगत सचिन देशमुख यांनी पक्ष सोडला होता. त्याचवेळी सचिन देशमुख यांना आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे पाठींबा देणार असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यानुसार गुरुवारी आमदार श्री. गुट्टे यांनी या संदर्भात माहिती दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले, परभणी महापालिका ही महापालिका आहे का प्रश्न पडतोय.

Ratnakar Gutte
सुवर्णपदक विजेती लक्ष्मी पवार अडचणीत, ऑलिम्पिकसाठी हवीय मदत

शहराचा विकास सोडून केवळ सेटलमेंटचे राजकारण सत्ताधारी पक्षासह इतर सर्वच पक्षांकडून होत आहे. महापालिकेत विरोधी पक्षाचे अस्तित्व नाही. आपण स्वतः या शहरातील विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देऊ केलेला आहे. त्यामुळे आमच्याकडे शहर विकासाचे व्हिजन असल्याने आम्ही शहराचा विकास निश्चित चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचमुळे सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष व रत्नाकर गुट्टे मित्र मंडळ प्रणित पॅनल या निवडणुकीत उभा केला जाईल. आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणुक लढविणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षासी आम्ही युती-आघाडी करणार नाहीत. शहरातील सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवू असे त्यांनी स्पष्ट केले.

Ratnakar Gutte
Hingoli : वसमतमध्ये साडेसहा लाखांची १४३ गांजाची झाडे जप्त

विकासाचा अजेंडा घेवून आलो आहोत : सचिन देशमुख

या आधी परभणीतील जुन्या जानत्या नेत्यांनी ज्या मोठ - मोठ्या इमारती बांधल्या त्या इमारतीची देखभाल दुरुस्तीच सत्ताधारी करू शकत नाहीत. तर ते शहराचा विकास काय करणार ? तेच तेच चेहरे निवडणुकीत निवडणु येतात व सेटलमेंटचे राजकारण सुरु होते. हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी आम्ही विकासाची जाण असणारे अनुभवी व तरूण युवकांना संधी देणार आहोत. विकासाचा अजेंडा घेवून ही निवडणुक लढविली जाईल असे सचिन देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()