परभणीच्या तापमानाची वाटचाल विक्रमाकडे; पारा ४३.०७ अंशांवर

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणीच्या तापमानाची विक्रमाकडे पुन्हा वाटचाल सुरू झाली आहे. दरवर्षी  ४६ ते ४७ अंशांच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात यंदा सातत्याने ढगाळ वातावरण राहात असल्याने उशिराने उष्णतेची लाट सुरू झाली आहे. रविवारी (ता. तीन) तापमान ४३.०७ अंशांवर राहिले.
परभणी जिल्हा मागील काही वर्षांत वरचेवर तप्त होत आहे. हिवाळ्यात तापमान ३० अंशांवर आणि उन्हाळ्यात ४६-४७ अंशांवर जात आहे. त्यामुळे जिल्ह्याचे तापमानचक्र बदलून गेले आहे. गोदावरी, दुधना, करपरासारख्या नद्यांच्या खोऱ्याने अन् काळ्याशार सुपिक जमिनीने समृद्ध असलेला जिल्हा सतत दुष्काळात भरडत आहे. शहरासह ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई ठरलेली आहे. येलदरी, लोअर दुधना, करपरा, सिद्धेश्वर, जायकवाडी या धरणांचे लाभक्षेत्र असूनही जिल्ह्याची पाणीटंचाईपासूनदेखील सुटका झालेली नाही. ज्याप्रमाणे दुष्काळ एक समस्या बनली आहे. तशीच तापमान वाढ हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाऊस सरासरी गाठतो तर हिवाळा अधिकच कडाक्याचा असतो. उन्हाळादेखील नवनवीन विक्रम करू लागला आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिला. त्यानंतरही हिवाळ्यात सातत्याने पावसाने हजेरी लावली. अगदी मार्च आणि आर्धा एप्रिल महिन्यातदेखील आवकाळी तडाखे दिले. त्यामुळे यंदा तब्बल महिनाभर उशिराने उष्णतेची लाट सुरू झाली. मागील चार दिवसांपासून परभणी चांगलीच तापली आहे. शनिवारी (ता. दोन) ४४.०२  अंशांवर तापमान होते. रविवारी (ता. तीन)  ४३.०७ अंशांवर तापमान राहिले. सकाळच्या तापमानातदेखील मोठी वाढ झाली आहे. २६.०३ कमाल तापमान नोंदविले गेले.
हेही वाचा : ‘त्या’ झाडावरती अनेक वर्षांपासून बसती वटवाघूळे... : वाचा कुठे?
गतवर्षीचे विक्रमी तापमान
ता.२४ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ४४ ते ४७.०२ अंश, सहा मे ते २१ मेपर्यंत ४३ ते ४४ अंशांत, २१ मे ते तून जूनपर्यंत ४६ अंश तापमान राहिले होते. २२ मार्चपासून सलग ६९ दिवस ४१ अंशांच्या पुढे तापमान गेले होते. तापमानाने ता. २८ एप्रिल २०१९ रोजी विक्रम केला होता. त्या दिवशी तापमान ४७.०२ अंशांवर होते. उष्माघाताने गतवर्षी सहा जणांचे बळी गेले होते.

हेही वाचा :​ बनावट पास घेऊन आले अन् क्वारंटाईन झाले
लाखो रुपयांचे साहित्य पडून
अनेक इलेक्ट्रिशियन, कारागिरांनी मार्च महिन्यापूर्वी कूलरचे साहित्य खरेदी केले आहे. सर्वाधिक मागणी डेझर्ट कूलरला असल्याने या कूलरचे सुटे भाग आणून कारागीर घरबसल्या असे कूलर तयार करून विक्री करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची खरेदी करून साहित्य आणले आहे. परंतु, लॉकडाउनमुळे मागणी असूनही कूलर तयार करता येत नाहीत आणि विक्रीदेखील होत नाही. त्यामुळे असे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.