परभणी : गुटख्यासह दोन लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त; चारठाणा पोलिसांची कारवाई

कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरु असून परभणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हाबंदी अनुषंगाने देवगाव फाटा येथे चेकपोस्ट लावण्यात आला आहे.
परभणी गुटखा
परभणी गुटखा
Updated on

चारठाणा ( जिल्हा परभणी ) : चारठाणा पोलिस ठाणे (Parbhani Charthana police station) अंतर्गत देवगाव फाटा चेकपोस्टवर मंठ्याकडुन जिंतूरकडे एका कारमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी देवगाव फाटा चेकपोस्टवर सापळा रचून कारवाई केली. एक लाख १३ हजार ९६० रुपये किंमतीचा गुटखा साडेचार हजार रोख व कार एक लाख रुपये किमतीची कार असा दोन लाख १८ हजार ४६० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपी ( two accused arest) विरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार (ता. नऊ) रोजी सकाळी सातच्या सुमारास करण्यात आली. Parbhani: Two lakh 18 thousand items including gutkha seized; Charthana police action

या बाबत आधिक माहिती की, कोरोना पार्श्वभूमीवर लाँकडाऊन सुरु असून परभणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हाबंदी अनुषंगाने देवगाव फाटा येथे चेकपोस्ट लावण्यात आला आहे. रविवार (ता. नऊ) रोजी अवैध मार्गाने मंठाहुन जिंतूरकडे कार (क्रमांक एम.एच.२० ऐ.जी.३१६१) यामध्ये बेकायदेशीररित्या गुटखा जात होता. दरम्यान देवगावफाटा चेकपोस्टवर चारठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार, फौजदार प्रदीप अल्लापुरकर, हवालदार गुलाब भिसे, अमृत शिराळे, शिवदास सुर्यवंशी, रासकटला आदींनी देवगाव फाटा चेकपोस्टवर कार थांबवून कारच्या डिकीत पाहणी केली असता शासनाने बंदी घाललेला एक लाख १३ हजार ४६० रुपये किंमतीचा गोवा गुटखा आढळून आला.

हेही वाचा - शेतामधील लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका महिलेचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या

यावेळी पोलिसांनी वरील एक लाख तेरा हजाराचा गुटखा व रोख साडेचार हजार आणि एक लाखाची कार असा दोन लाख १८ हजार ४६० रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिस अमलदार शिवदास सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन शेख जुनेद शेख आयुब, शेख अकील शेख अजमत या दोघाविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार प्रदीप अल्लापुरकर करीत आहेत. दरम्यान, मागील आठवड्याभरापुर्वी देवगाव फाटा चेकपोस्टवर चारठाणा पोलिसांनी दोन लाख ३२ हजारांची देशी दारु पकडली होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.