Parbhani : कृषी उद्योजक घडले पाहिजेत ; कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी

मशरूम जागृती कार्यक्रम
Vasantrao Naik Marathwada Agricultural University
Vasantrao Naik Marathwada Agricultural Universitysakal
Updated on

परभणी : विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता कृषी अभ्यासक्रमाच्‍या अंतिम सत्रात अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येतो. यात शेतमाल उत्‍पादन, प्रक्रिया ते त्‍यांचे विपणन याचा प्रत्‍यक्ष अनुभव विद्यार्थ्‍यांना होतो. हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवून यातून कृषी उद्योजक घडले पाहिजेत. मशरूम हे एक पौष्टिक व आरोग्‍यदायी पदार्थ आहे. याबाबत समाजात जागृती करण्‍याची गरजेची आहे. त्याचे उत्‍पादन व पुरवठ्यात सातत्‍य पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणी यांनी मंगळवारी (ता.३१) केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागाच्‍या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी चविष्‍ट मशरूम जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, विद्यापीठ अभियंता दीपक काशाळकर, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्‍माईल, विभाग प्रमुख डॉ. कल्‍याण आपेट आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. मणी पुढे म्‍हणाले, ‘‘कृषीपूरक अनेक जोडधंदे आहेत. त्‍यात युवकांच्‍या कौशल्‍य विकासाकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. वर्ष २०२३ हे वर्ष आंतरराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष म्‍हणून आपण साजरे करीत आहोत. परभणी विद्यापीठाने देशातील ज्‍वारीचा पहिला जैवसपृद्ध वाण परभणी शक्‍ती विकसित केला आहे. बाजरीमधील जैवसपृद्ध वाण एएचबी-१२०० एफई आणि एएचबी-१२६९ एफई विकसित केले. यात लोह व जस्‍त प्रमाण अधिक असून आरोग्‍यास हितकारक आहे. याबाबत जास्‍तीत-जास्‍त जनजागृती करावी लागेल. यशस्वितेसाठी डॉ. संदीप बडगुजर, डॉ. चंद्रशेखर आबडकर, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. महेश दडके आदींसह विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

सादर केली नाटिका

अनुभवात्‍मक शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांनी मशरूमपासून बनविलेले चविष्‍ट पदार्थ, धपाटे, भजे, पिझ्झा, वडापाव, मशरूम बियार्णी, सैंडविच आदी पदार्थांचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते. या पदार्थाचे मान्‍यवरांनी चव चाखली. कुलगुरू यांनी विद्यार्थ्‍यांचे कौतुक केले. विद्यार्थ्‍यांनी आरोग्‍याकरिता मशरूमवर नाटिका सादर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()