Parbhani : येलदरी धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर; आज ९४.८२ टक्के जलसाठा

yeldari dam
yeldari damsakal
Updated on

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशयात सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ९४.८२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला.तो गतवर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी जास्त आहे. तालुक्यात पाऊस कमी असलातरी उर्ध्व भागातील खडकपूर्णा (जि.बुलडणा) प्रकल्पामधून मागील महिन्यापासून अधूनमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे येलदरी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत असून सोमवारी सकाळपर्यंत ९४.८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षी या दिवशी ता. ५.९.२०२१ रोजी ९२.४६ टक्के पाणीपुरवठा उपलब्ध होता.सदरील वाढ पाहता येत्या काही दिवसातच धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वाटत आहे.

येलदरी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ९३४.४४० दशलक्ष घनमीटर असून जिवंत पाणीसाठ्याची क्षमता ८०९.७७० दशलक्ष घनमीटर एवढी आहे.आज (ता.५) सकाळपर्यंत ८९२.५४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून पैकी ७६७.८७२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. ज्याची टक्केवारी ९४.८२ एवढी असून गेल्या चोवीस तासामध्ये धरणात ८.४२१ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()