परभणीच्या तरुणाचा नवा विक्रम, बुलेटसफरीची 'इंडिया बुक'मध्ये नोंद

परभणीतील शैलश कुलकर्णी याच्या चारधाम व चार सिद्धपिठाच्या बुलेट सफरची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे.
Shailesh Kulkarni
Shailesh Kulkarniesakal
Updated on

परभणी : जिद्द, परिश्रम आणि सामाजिक जाणिवेतून प्रेरित झालेल्या परभणीतील शैलेश कुलकर्णी याच्या चारधाम (Char Dhaam) व चार सिद्धपिठाच्या बुलेट सफरची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of Records) नोंद झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाच्या जनजागृतीसाठी शैलेश कुलकर्णीने ही ८ हजार ४५४ किलोमीटरची यात्रा मोठ्या धाडसाने पूर्ण केली होती. शैलेश कुलकर्णीच्या या यशामुळे परभणीकरांची मान गौरवाने उंचावली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परभणी शहरातील (Parbhani) येथील येलदरकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या शैलेश या ध्येयवेड्या तरूणाने आज पर्यंत प्रवासाचे अनेक विक्रम पूर्ण केले आहेत. स्वत:चा व्यवसाय सांभाळत आजपर्यंत तब्बल सहा वेळा त्याने संपर्ण देश पादाक्रांत केला आहे. प्रत्येक वेळी सामाजिक बांधिलकी बाळगत वेगवेगळ्या जनजागृतीसाठी त्याने भ्रमंती मोहिम फत्ते केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाच्या जनजागृतीसाठी त्याने चारधाम व आद्य शंकराचाऱ्यांनी स्थापित केलेले चार सिद्धपीठांची निवड केली. (Shailesh Kulkarni)

Shailesh Kulkarni
सिंगल चार्जमध्ये १०० किमी धावणारी Roadlark Electric सायकल

नऊ ते २६ ऑक्टोबर दरम्यान शैलेश कुलकर्णी याने स्वताच्या बुलेट गाडीवर ही मोहिम पूर्ण केली. या प्रवासामध्ये दररोज ६०० ते ७०० किलोमीटर प्रवासात गायत्रीपीठ (द्वारका), ज्योतीमठ (बद्रीनाथ), गोवर्धन पीठ (जगन्नाथपुरी), श्रृंगेरीपीठ (कर्नाटक) यासह द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी व रामेश्वरम या चारधामचा प्रवास पूर्ण केला. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत असतांनाच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नेही त्याच्या कामगिरीची दखल घेतली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक बसवरुप रॉय चौधरी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र नुकतेच शैलेशला प्राप्त झाले आहे.

Shailesh Kulkarni
Hingoli | हळदीला मिळतोय आठ हजार ५०० रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा

विविध यात्रा केल्या पूर्ण

शैलेश कुलकर्णी याने आतापर्यंत भारतीय सेना सन्मान यात्रा (२०१७ ) ही काश्मिर ते कन्याकुमारी, परभणी - लौंगीवाला - रन ऑफ कच्छ (२०१८), भारत - नेपाळ - भुतान या तीन देशात से नो टु सिंगल युज प्लास्टिक (२०१९), नर्मदा परिक्रमा (फेब्रुवारी २०२० ) या परिक्रमेची नोंद गिनिज बुकात झाली, दत्त परिक्रमा (डिसेंबर २०२०) या साहसी यात्रा पुर्ण केल्या आहेत. त्यात आता चारधाम व चारसिध्दपिठाच्या यात्रेची भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.