परभणी : शाळेची पुस्तके, गणवेश घेणे आर्थिकदृष्ट्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी समाजातील अनेक दानशूर हात पुढे येतात आणि मग या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होण्याचा मार्ग सुकर होतो. असेच समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या एचएआरसी संस्थेने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले अन त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.