Parli Vaijnath Railway Station : परळी वैजनाथ रेल्वे स्थानकासाठी १५ कोटीचा निधी; रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भरतेशकुमार जैन

अमृत भारत योजने अंतर्गत परळी वैजनाथ येथील रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार असून या योजनेतंर्गत विविध कामे रेल्वे स्थानकावर सुरू आहेत.
Bharteshkumar Jain
Bharteshkumar Jainsakal
Updated on

परळी वैजनाथ - येथील रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजने अंतर्गत समावेश करण्यात आला असून, या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आँगस्ट २३ मध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. या योजनेचे पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू असून ३० टक्के काम पुर्ण झाले आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये खर्च करुन रेल्वे स्थानकाची नवीन इमारत उभी राहणार आहे. यासंदर्भात पाहणी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी येथील स्थानकास भेट दिली.

अमृत भारत योजने अंतर्गत येथील रेल्वे स्थानकाचे रुप पालटणार असून या योजनेतंर्गत विविध कामे रेल्वे स्थानकावर सुरू आहेत. या योजनेत रेल्वेस्थानकांचा पायाभूत विकास करण्यात येणार असून त्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

स्थानकांचा विकास करताना दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेवून त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे, स्थानकाच्या बाह्यरूपासोबतच अंतर्गत भागातही सुधारणा करण्याची तरतूद या योजनेत आहे. एकंदरीत प्रवासी केंद्रीत सुविधा स्थानकांवर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

याचाच एक भाग म्हणून दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी येथील स्थानकास भेट दिली. यावेळी दै.सकाळच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री जैन यांनी सांगितले की, येथील स्थानकाचा विकास सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. याचे ३० टक्के काम पुर्ण झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये खर्च करून सध्या अस्तित्वात असलेली इमारत पाडून त्याच ठिकाणी विस्तारित नवीन इमारत होणार आहे. तसेच रेल्वे केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात २०१०-११ मध्ये मंजुरी मिळालेल्या परभणी-परळी दुहेरीकरण काम सुरू होणार आहे. दुहेरीकरण मार्गासाठी ७६९ करोड १३ लाख रुपये निधी मंजूर आहे.

तसेच येथील प्रस्तावित परळी-परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व रेल्वे यार्डाच्या कामासाठी केंद्र सरकारच्या वतीने शहरातील आझादनगर, मिलिंदनगर, बरकतनगर, गंगासागर नगर, वैजवाडी शिवारातील अनेक सर्व्हे नंबरमधील जमीन, घरे अधिग्रहित करण्याचे भारत सरकारच्या राजपत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे. याचे जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असून यासाठी काही कालावधी लागणार आहे. पण हे कामही होणार असल्याचे भरतेशकुमार जैन यांनी सांगितले. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.