पंचायत समिती सदस्याचा अवेळी मृत्यू, अनेकांच्या घराला दिलाय आधार

महेश आकात
महेश आकातसकाळ
Updated on

राहुल मुजमुले/सकाळ वृत्तसेवा

परतूर (जि.जालना) : परतूर (Partur) तालुक्यातील सातोना गणाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश आकात (Accident In Jalna) यांचे सातोना-परतूर रस्त्यावर चिंचोली येथील दुधना पुलावर वाहनाचा तोल सुटल्याने रविवारी (ता.एक) रात्री ११ च्या दरम्यान वयाच्या ४० व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. महेश आकात हे मागील अनेक दिवसांपासून राजकारणासह उद्योग व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. यश दूध डेअरी, यश इंग्लिश स्कुल, यश सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला होता. काँग्रेस पक्षाचे (Congress Party) भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पूर्ण तालुका पाहत असे. अनेक युवकांना दुग्ध व्यवसायसाठी त्यांनी पाठबळ देत स्वतंत्र व्यवसाय निर्माण करून दिले होते. रविवारी मैत्री दिनाच्या (Friendship Day) दिवशी परतूर येथे आपल्या जिवलग मित्रांना भेटण्यासाठी ते आले होते.

चिंचोली - सातोना रस्त्यावर चिंचोली  पुलावर घटनास्थळी झालेली ग्रामस्थांची गर्दी.
चिंचोली - सातोना रस्त्यावर चिंचोली पुलावर घटनास्थळी झालेली ग्रामस्थांची गर्दी. सकाळ
महेश आकात
काँग्रेस सदस्यांची भाजपच्या पंचायत समिती उपसभापतींना मारहाण

रविवारी रात्री ११ वाजता परत जात असताना वाहनाचा तोल सुटून वाहन दुधना नदीच्या पात्रात उतरली व पाण्यात सीट बेल्ट काढता आला नसल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द केला. मागील एक महिन्यापूर्वीच त्यांचे मोठे बंधू यांचे पण अपघाती निधन झाले होते. महेश आकात यांचा त्यांच्या सातोना येथील शेतात सोमवारी (ता.दोन) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.