Crime News : गायींचा संशय, पण निघाला ६४ लाखांचा गुटखा

समृद्धी महामार्गावरील घटना : कारचालकाने केला पाठलाग, पोलिसांनी लावला ट्रक आडवा
Crime
Crimesakal
Updated on

फुलंब्री - नागपूरहून समृद्धी महामार्गाने भरधाव निघालेल्या ‘आयशर’ने मेहकरनजीक एका कारला धक्का दिला. कारमधील प्रवाशांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, आयशर थांबला नाही. ग्रामस्थांना त्यात गायी असल्याचा संशय आला. त्यांनी समृद्धी महामार्गावरून दोनशे किलोमीटर पाठलाग केला. या भरधाव आयशरने रस्त्यात आणखी दोन-तीन वाहनांना धडक दिली.

अखेर पोलिसांनी सावंगी इंटरचेंजवर ट्रक आडवा लावून आयशरला घरले. मंगळवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास हा थरार घडला. आयशरचालक फिरोज शेख (रा. वळदगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) व अंबादास अर्जुन मडीकर (रा. वाळूज) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. आयशरचालकाला ताब्यात घेऊन आयशरमधील ६४ लाख ७ हजार ६४० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत माहिती अशी की, नागपूरहून समृद्धी महामार्गावरून रात्री निघालेल्या आयशर ट्रकने (एमएच २० जीसी २३८५) रात्री दहाच्या सुमारास मेहकरनजीक (जि. बुलडाणा) एका कारला धडक दिली. सुदैवाने या कारमधील प्रवासी बालंबाल बचावले. त्यांनी कार वेगात घेत आयशरला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने आणखी वेगात आयशर पळविला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना शंका आली. त्यांनी आयशरचा सिनेस्टाइल पाठलाग सुरू केला.

कारचालक पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच आयशरचालक बिथरला. भरधाव आयशर पळविताना त्याने महामार्गावरील आणखी काही वाहनांना धक्का दिला. कारमधील विजय पवार आणि सहकाऱ्यांनी आयशरचा पाठलाग करत महामार्ग पोलिस निरीक्षक नागरे यांना घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर फुलंब्री ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सहाणे यांनाही माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ समृद्धी महामार्गावर सावंगी इंटरचेंजवर ट्रक आडवा लावून आयशरला रोखले. हायवे पोलिस आणि फुलंब्री पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यात गुटखा आढळून आला. पोलिसांनी चालक फिरोज शेख याला ताब्यात घेत आयशर पोलिस ठाण्यात जमा केला. त्यात ६४ लाख ७ हजार १४० रुपयांचा गुटखा आणि २० लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ८३ लाख ९६ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुटख्यांच्या १४६ गोण्या

पोलिसांनी आयशरची तपासणी केली असता, त्यात गुटख्याच्या तब्बल १४६ गोण्या आढळून आल्या. बाजारात या गुटख्याची किंमत ६४ लाख ७ हजार १४० रुपये आहे, तर हा गुटखा घेऊन जाणारा २० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण ८३ लाख ९६ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर चेकपोस्टची मागणी

नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर कुठेही चेकपोस्ट नसल्याने या महामार्गावर गुटख्यासह इतर अवैध धंद्यांची रात्रीच्यावेळी सुसाट वाहतूक केली जाते. यामध्ये कुठल्याही वाहनांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुटखाविक्रीसह अवैध धंदे फोफावत आहेत.

सुमारे २०० किलोमीटर पाठलाग करून आयशर ट्रकला पकडून दिलेले हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी या समृद्धी महामार्गावर पाच चेकपोस्ट उभारण्यात यावेत, अशी मागणी करत या महामार्गावरून कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींची वाहतूक होते, असा दावाही यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com