Phulambri: गिरीजा नदीची साडी चोळीने भरली ओटी, अनुराधा चव्हाण यांनी केले जलपूजन

Latest Maharashtra News: या वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी सुखावलेला आहे.
Phulambri: गिरीजा नदीची साडी चोळीने भरली ओटी, अनुराधा चव्हाण यांनी केले जलपूजन
Updated on

Latest Marathawada News: फुलंब्री तालुक्यातून वाहणाऱ्या गिरजा नदीपात्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात रविवार व सोमवारी पडलेल्या पावसाचे पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करू लागला आहे. परिणामी वडोद बाजार येथील गिरीजा नदीच्या पुलावरून बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी साडीचोळीने ओटी भरून गिरीजा नदीचे जलपूजन मंगळवारी (ता.तीन) केले आहेत.

फुलंब्री तालुक्यातील मागील गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी अधिक प्रमाणात राहत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. मात्र या वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी सुखावलेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.