:
Marathwada Latest news: फुलंब्री विधानसभा मतदार संघासाठी भाजप पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्यामुळे पक्षाने आता नवीन प्रयोग राबविला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजपचे 347 पदाधिकाऱ्यांनी बंद लिफाफ्यात प्राधान्य क्रमाने पसंती देऊन विधानसभेसाठी उमेदवार ठरविला आहे. सदरील प्रक्रिया मंगळवारी (ता.एक ) सायंकाळी पाच वाजेपासून राबविण्यात आली. त्यामुळे भाजपच्या या नवीन फार्मूल्याने इच्छुक उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसून आला.
महाराष्ट्रातमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळवायची असल्याने एक - एक उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती शर्तीचे प्रयत्न करणार आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पक्षाला दगा फटका बसू नये म्हणून, भाजपने यापूर्वी फुलंब्री विधानसभा मतदार संघात दोन ते तीन वेळेस सर्वे केलेले आहे.
तसेच आता सर्वच इच्छुक मागील गेल्या महिन्याभरापासून एकत्र मतदारसंघात दौरे करत असल्याने कमळ हाच उमेदवार असल्याचे गावागावात जाऊन सांगत असेल तरी मात्र शरीराने एकत्र आले तरी मनाने दुरावलेले असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील 347 भाजपाचे पदाधिकारी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील उमेदवार कोण..? याचे भवितव्य ठरविले आहे.
यामध्ये बंद लिफाफ्यात तीन इच्छुक उमेदवारांना प्राधान्य क्रम देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदार संघातील सावंगी परिसरातील एका खाजगी लॉन्समध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांचा पसंती क्रमांक प्रक्रिया राबविण्याची माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने मंगळवारी सकाळपासूनच भाजपच्या इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडालेली दिसून आले. त्यामुळे आता पदाधिकारी कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
.......
फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून सुमारे दहा जण इच्छुक असल्याने उमेदवारी कुणावर सोपवायची याची पक्षात डोकेदुखी झाली होती. त्यामुळे पक्षाने अगोदर सर्वे केला. त्यानंतर आता शेवटचा आणि अंतिम टप्पा म्हणून पदाधिकाऱ्यांचा कौल पक्ष जाणून घेत आहे. भाजपच्या सर्व आघाड्याच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन या प्रक्रियेची माहिती देत प्रत्येकाला टोकन देण्यात आले होते. या टोकन प्रक्रियेप्रमाणे एका पदाधिकाऱ्याला भाजपकडून कोणत्याही इच्छुक तीन जणांना पसंती देणे अनिवार्य केलेले होते. त्यादृष्टीने प्रत्येक इच्छुक आपापल्या पसंतीनुसार कोणत्याही तीन इच्छुक उमेदवाराचे नाव आणि एक - दोन - तीन असे प्राधान्यक्रम बंद लिफाफ्यात देत होते. ही प्रक्रिया राबविल्या जाणाऱ्या ठिकाणी मोबाईलवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.....
फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी पसंतीचा नवीन प्रयोग पक्ष राबवीत असल्याची माहिती इच्छुक उमेदवाराला मिळाल्यानंतर त्यांनी वेळ न घालवता आपल्या यंत्रणेमार्फत जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांना कॉल करून पसंती क्रमांक एक देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना फोन करताना इच्छुकांच्या नाकी नव आल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.