Phulambri Vidhansabha Constituency : मतदाराच्या पसंतीवरच ठरणार काँग्रेसचा उमेदवार..! सर्वेत ज्याचे नाव अगोदर, तोच ठरणार बाजीगर

फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुकांची रणनीती आखणी सुरू आहे.
Congress Party
Congress Partyesakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुकांची रणनीती आखणी सुरू आहे. मात्र मतदाराच्या पसंतीवरच काँग्रेसचा उमेदवार ठरणार असून सर्वे ज्याचे नाव अगोदर, तो ठरणार बाजीगर, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जो तो मतदार संघात फिरून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडू लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे गांधीभावनात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून कुणाल चौधरी यांनी शुक्रवारी (ता.२०) मुलाखती घेतल्या. त्यातही काँग्रेस पक्षाच्या चारही सर्वेत ज्याचे नाव अगोदर येईल तोच उमेदवार राहणार असल्याची संकेत पक्षनिरीक्षकांनी दिल्याची माहिती विश्वासने सूत्रांनी दिली.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जास्तीचा काळ भाजपच्या ताब्यात राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार होण्याचा मान आताचे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मिळविला आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्याने भाजपकडून दुसऱ्या फळीतील पदाधिकारी तयारी लागली आहे.

त्याच धर्तीवर बागडे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले डॉ. कल्याण काळे हे जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे हा मतदारसंघ आमदार नसल्याने पोरखा झाला आहे. त्यामुळे पक्षाच्या निरीक्षकाकडून वेळोवेळी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाऊ लागले आहे. या मुलाखतीतही महाराष्ट्राचे निरीक्षक कुणाल चौधरी यांनी पक्षाकडून होणाऱ्या चारही सर्वेत ज्याचे नाव अगोदर येईल त्यालाच उमेदवारी दिली जाईल.

असे स्पष्ट संकेत दिल्याने सर्वच इच्छुक आता मतदारसंघात सैरभैर होऊन फिरू लागले आहे. काँग्रेसकडून खासदार डॉ.कल्याण काळे पक्षातील संघटनावर भर देत आहे. काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील पदाधिकारी आमदारकीची तयारी करू लागले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या अस्तित्वाच्या लढाईत पक्ष कोणावर जबाबदारी देतो हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे.

काँग्रेसकडून यांनी दिल्या मुलाखती

* जगन्नाथ काळे

* विलास औताडे

* संदीप बोरसे

* मोहन देशमुख

उमेदवारी देताना या गोष्टीचा होणार विचार

काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देताना पक्षासाठी आतापर्यंत केलेले कार्य विचारात घेतले जाणार आहे. तसेच आतापर्यंत इच्छुक उमेदवारांनी कोणकोणत्या लढलेल्या निवडणुकीत विजय, पराजय आणि निवडणुक काळातील उमेदवाराचे प्रतिमा विचारात घेतली जाणार आहे. सर्वेत जनसामान्यातून सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या इच्छुक उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे.

शिफारसी इतिहास जमा

पूर्वी काँग्रेसमध्ये एखाद्या मोठ्या नेत्यांनी शिफारस केल्यानंतर लगेच उमेदवारी मिळत होती. मात्र आता काळ बदलला असून जनताच उमेदवार देणार आणि जनताच निवडून आणणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांच्या शिफारसींना फारसे महत्त्व राहिले नाही. त्यामुळे आता जनताच कोणाला आमदार करायचे आणि कोणाला घरी बसवायचे हे ठरविणार आहे. त्यामुळे शिफारसी आता इतिहास जमा झाल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.