पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना खाते अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक,अशी घ्या काळजी
येरमाळा : जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.
या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्यांनी तीन हफ्त्यांत ही रक्कम दिली जाते.मात्र या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत.या योजनेचे खाते अपडेट करा म्हणुन एका लिंकचा मॅसेज येतो आणि शेतकऱ्यांचे बँकेचे खातेच रिकामे होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाील आपले खाते अपडेट करा,आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का चेक करा, तुमचा अडकलेला हफ्ता, मिळवा,तुमचा हफ्ता आत्ताच मिळावा,
कोण कोण घेऊ शकतो योजनेचा लाभ,आता किसान सन्मान निधी पोर्टल उपलब्ध अशा एक ना अनेक प्रकारच्या मॅसेज मधुन अशी एक एपीके लिंक व्हायरल होत आहे.या लिंकवर क्लीक केल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही लिकंवर क्लीक करू नये,असे आवाहन पोलीस प्रशासनही करीत आहे.
ही एका प्रकारची सायबर फसवणूक आहे.तुम्ही या लिंकवर क्लीक केल्यानंतर मोबाईल फोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा मोबाईल आणि सीमकार्ड हॅक होते. मोबाईल आणि सीमकार्डचा कंट्रोल घेतला जातो.यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही लिंकवर क्लीक कर नये. अन्यथा शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे होऊन आर्थिक नुकसान होऊ शकते.अशा प्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तात्काळ बँकेला अथवा वरील प्रमाणे नमूद केलेल्या पद्धतीने सायबर फ्रॉड,फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी लगेच १९३० या हेल्पलाईन नंबरवर कॉल करावा.तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तक्रार दाखल करावी.
असे प्रकार आपल्या भागात घडले नाहीत मात्र असे प्रकार कांही ठिकाणी घडले आहेत,अशा प्रकारांना रोकण्यासाठी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाने शेतकऱ्यांना सावध करावे.अशा कोणत्याही लिंकला क्लिक करु नये अशा सूचना फालकावर डकवाव्यात त्यामुळे शेतकरी सावध होतील.
- महेंद्र भोर. शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक येरमाळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.