Amravati Crime: अमरावती एसीबीची नांदेडात कारवाई ; वाहन निरिक्षकासह एजंट अडकला सापळ्यात

Latest Maharasthra Crime News: विरुद्ध पोलीस स्टेशन देगलूर जि. नांदेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई केतन मांजरे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.विभाग,अमरावती यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Amravati Crime
Amravati Crimesakal
Updated on

नायगाव : पाचशे रुपयाची लाच घेतांना आर टी ओ सिमा तपासणी नाका देगलूर येथील मोटार वाहन निरिक्षकासह एका खाजगी एजंटला अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची सापळा कारवाई (२५) सप्टेंबर रोजी करण्यात आली असून या प्रकरणी अकोला येथील ट्रान्सपोर्ट मालकाने तक्रार दिली होती. नांदेडात येवून अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असल्याने वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

सध्या नांदेड देगलूर मार्गावर आर टी ओ सह महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांना सळो की पळो करुन सोडले आहे. रात्री बे रात्री वाहणे अडवून लुट केल्या जात आहे. या दोन यंत्रणेमुळे हतबल झालेले वाहण चालक आर टी ओ व महामार्ग सुरक्षा पोलीसांच्या कुळाचा उध्दार करत आहेत.

Amravati Crime
Amravati Bus Accident: अमरावतीत खासगी बसचा भीषण अपघात! 50 प्रवासी जखमी, चौघांचा मृत्यू... शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश

बरबडा फाटा येथे तर अनेकवेळा वाहण चालकांनी रात्रीला वाहण अडवण्याच्या प्रकारामुळे महामार्ग पोलीसांना प्रसाद दिल्याचीही चर्चा असून निर्लज्ज महामार्ग पोलीस पुन्हा लुट करण्याच्या कामात व्यस्त आहेत पण एक मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी एजंट मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने आरटीओ विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

अकोला येथील एका ट्रान्सपोर्ट मालकाचे ट्रक देगलूर मार्गे जातात. परंतु सिमा तपासणी नाका देगलूर येथील मोटार वाहन निरिक्षक अमोल धर्मा खैरनार, (वय ४२) वर्षे यांनी एका खाजगी एजंटामार्फत अडवणूक करुन नेहमीच लुट करत होते. (ता.२४) सप्टेंबर रोजीही ट्रक अडवण्यात आला व कागदपत्राची तपासणी करण्यात आली पण कागदपत्रे बरोबर असतानाही पैशाची मागणी केली.

लाच द्यायची मानसिकता नसल्याने अकोला येथील संबधीत ट्रान्सपोर्ट मालकाने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दिलेल्या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर (ता.२५) सप्टेंबर रोजी सापळा लावण्यात आला.

Amravati Crime
Amravati: शेवटचा दिवस मनसोक्त जगले! आई अन् मुलाने तलावात उडी घेत जीवन संपवले

कार्यवाही दरम्यान देगलूर येथील आरटीओ चेक नाक्यावरील खाजगी एजंट गोपाळ इंगळे यांनी पंचा समक्ष व अमोल खैरनार मोटार वाहन निरीक्षक देगलूर चेक पोस्ट यांच्या उपस्थितीत तडजोडी अंती ५०० रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याने तसेच आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान ५०० पंचासमक्ष व अमोल खैरनार मोटर वाहन निरीक्षक देगलूर चेक पोस्ट यांच्या समक्ष लाच रक्कम स्वीकारल्याने वर नमुद अमोल खैरनार व खाजगी इसम गोपाल इंगळे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

सापळा कार्यवाही दरम्यान खैरनार यांच्या कार्यालयातून रोख रक्कम ६३८२० रुपये मिळून आल्याने त्याबाबत खैरनार यांच्याकडे नमूद रकमेबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्यांनी योग्य समाधान कारक उत्तर दिले नाही तसेच सदर रकमेबाबत कॅशबुक रजिस्टर ला कोणत्याही कायदेशीर नोंदी दिसून आल्या नाही. त्यामुळे नमूद रक्कम पंचासमक्ष पुढील तपास कामी जप्त करण्यात आली आहॆ. तसेच त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन देगलूर जि. नांदेड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई केतन मांजरे , पोलीस निरीक्षक, ला.प्र.विभाग,अमरावती यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Amravati Crime
Amravati Crime: अमरावती हादरलं! दिवसा-ढवळ्या अल्पवयीन मुलीवर चाकूहल्ला, आरोपी पळत असताना ऑटो चालकाने पकडलं अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.